शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी अभिनेत्याची वेदनादायी अखेर

By admin | Updated: August 13, 2014 02:45 IST

आॅस्कर विजेते हॉलीवुड अभिनेते रॉबिन विल्यम्स मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे

लॉस एंजल्स : आॅस्कर विजेते हॉलीवुड अभिनेते रॉबिन विल्यम्स मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. ‘गुड विल हंटिंग’, ‘डेड पोएट्स सोसायटी’ व ‘ गुड मार्निंग व्हिएतनाम’ या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय ठरला होता. विनोदी अभिनयात तर त्यांचा कोणीही हात धरू शकत नव्हते. त्यांची अकाली एक्झिट रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. टिबुरोन, कॅलिफोर्निया येथील राहत्या घरी ते सोमवारी बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांची श्वासोच्छ्वास थांबलेला होता. आपत्कालीन कर्मचारी आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटते. श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विल्यम्स यांच्या प्रसिद्धी अधिकारी मारा बुक्सबॉम यांनी सांगितले की, विल्यम्स यांना मागील काही काळापासून नैराश्याने ग्रासले होते. ही एक दु:खद आणि अकस्मात झालेली हानी आहे. विल्यम्स यांच्या पत्नी सुसान श्नाइडर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, आज सकाळी मी माझा पती व सर्वात चांगला मित्र तर जगाने आपला सर्वात आवडता कलाकार आणि सुंदर व्यक्ती गमावली. मी अंतर्बाह्य कोलमडले आहे. विल्यम्स यांचे व्यवस्थापक म्हणून गेली ३५ वर्षे काम करीत असलेले डेव्हिड स्टेनबर्ग म्हणाले की, कोणीही रॉबीन विल्यम्सप्रमाणे जगाला हसविलेले नाही. माझा भाऊ, माझा मित्र आणि माझे सर्वस्व असलेल्या या माझ्या साथीदाराला मी सदैव स्मरणात ठेवेन. चारवेळा आॅस्करसाठी नामांकन झालेल्या विल्यम्स यांना १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडविल हंटिंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा आॅस्कर मिळाला होता. याशिवाय त्यांना दोन एमी, चार ग्लोडन ग्लोब, पाच ग्रॅमी आणि दोन एसएजी पुरस्कार मिळाले होते. ते अलीकडे ‘द क्रेझी वन्स’ या मालिकेत दिसले होते. त्यांच्या निधनाने हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. (वृत्तसंस्था)