शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘एकत्र या, नाहीतर युरोप नामशेष होईल!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:15 IST

आत्ताच्या परिस्थितीत नेमकं कसं वागावं, याबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रमावस्था आहे. त्यातूनच अनेक राष्ट्र फक्त आपल्यापुरता, स्वत:पुरता विचार करतं आहे. ‘इटली फस्र्ट’, बेल्जियम फस्र्ट’, ‘र्जमनी फस्र्ट’. हेच धोरण सगळ्यांनी राबवलं आणि तसाच विचार केला, तर युरोप वाचणं महाकठीण होईल. उंटाच्या पाठीवरची ती शेवटची काडी ठरेल.

ठळक मुद्देतज्ञ म्हणताहेत, स्वार्थ सोडा, अन्यथा कोणीच वाचणार नाही

- लोकमत न्यूज नेटवर्क

युरोपचं काय होणार, कोरोनामुळे युरोप किती वर्षं मागे फेकला जाईल या चिंतेनं युरोपातल्या तज्ञ आणि विचारी लोकांना आता ग्रासलं आहे. सध्या कोरोनानं युरोपात हाहाकार माजवला आहे. युरोपातील अनेक राष्ट्र हवालदिल झाली आहेत. त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. हीच वेळ आहे, ती एकजूट दाखवण्याची आणि युरोपातील सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्याची. प्रत्येक राष्ट्र वेगवेगळं आणि आपापल्या पद्धतीनं या  कोरोनाचा मुकाबला करायला गेलं, तर कोरोना संपेल की नाही, ते माहीत नाही, पण युरोपातील सगळीचं राष्ट्र संपतील, त्यांना इतका मोठा फटका बसेल, की त्यातून ते कधी सावरूच शकणार नाहीत, असा गंभीर इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. त्यांच्यामते कोरोनाचा फटका आजपर्यंतच्या कुठल्याही  आपत्तीपेक्षा मोठा असेल. आत्ताच्या परिस्थितीत नेमकं कसं वागावं, याबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रमावस्था आहे. त्यातूनच अनेक राष्ट्र फक्त आपल्यापुरता, स्वत:पुरता विचार करतं आहे. ‘इटली फस्र्ट’, बेल्जियम फस्र्ट’, ‘र्जमनी फस्र्ट’. हेच धोरण सगळ्यांनी राबवलं आणि तसाच विचार केला, तर युरोप वाचणं महाकठीण होईल. उंटाच्या पाठीवरची ती शेवटची काडी ठरेल. हे धोरण इतकं घातक आहे, की त्यामुळे ते स्वत: तर मरतीलच, पण इतर सार्‍यांनाही घेऊन मरतील, त्यामुळे स्वत:पुरता विचार न करता सगळ्यांचा एकत्रित विचार करा, अशी कळकळीची विनंती या तज्ञांनी केली आहे. ज्यांनी युरोपला एकत्र आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ते युरोपियन युनियनचे माजी अध्यक्ष जॅक्स डेलॉर्स यांनीही यासंदर्भातलं आपलं मौन तोडत सगळ्यांना निर्वाणीचा इशारा देताना एकाच वाक्यात सांगितलं, ‘एकत्र या, नाहीतर युरोपच्या मृत्यूला तयार राहा!’अत्यंत मीतभाषी असलेल्या डेलॉर्स यांनी आणखी एका मुलाखतीत वस्तुस्थितीची जाणीव करून देशताना सांगितलं, ‘युरोपिय देशांतील  संवाद आता किमान पातळीवर आला असून दहा वर्षांपूर्वी जेवढा संवाद एकमेकांत  होता, तेवढाही संवाद आता या देशांत राहिलेला नाही. सर्वच संशयी झालेत. संशयाचा हा कीडा युरोपला केवळ विनाशाकडेच नेऊ शकतो.’युरोपियन फॉरिन पॉलिसीच्या माजी सल्लागार नथाली टोक्की यांनी तर सांगितलंय, ‘करा किंवा मरा’ एवढा एकच पर्याय आता युरोपियन देशांपुढे आहे. प्रत्येकानं आपापलंच घोडं पुढे दामटायचं ठरवलं, तर ब्रम्हदेवही युरोपला नष्ट होण्यापासून वाचवू शकणार नाही. कारोना संकटानं थैमान घालायला सुरुवात केल्याबरोबर इटलीनं स्वत:ला वेगळं केलं. युरोपातील अनेक देशांनी आपली मेडिकल किट्स निर्यात करण्यावर बंदी घातली. प्रत्येकानं आपापल्या बॉर्डर्स सिल केल्या, त्यामुळे युरोपातलेच हजारो नागरिक कुठे कुठे अडकून पडले. पण याची जाणीव झाल्यानंतर र्जमनी, ऑस्ट्रिया आणि लक्झेम्बर्ग यांनी युरोपातील इतर देशांसाठीही आपली हॉस्पिटल्स खुली केली. फ्रान्स आणि र्जमनी या देशांनी तर चीनपेक्षाही जास्त मास्क्स इटलीला पुरवले. पण अगोदरची स्थिती मात्र फारच भयानक होती. युरोपातल्याच देशांनी एकमेकाकंना मदत करायला नकार दिला होता. इटलीच्या शेजारच्या देशांनीही त्यांना मदत नाकारली. अशा वेळी  रशिया आणि चिननं त्यांना मोठी वैद्यकीय मदत केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या