शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादविरोधात सहकार्याची साद

By admin | Updated: August 16, 2015 22:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी येथे आगमन झाले. या महत्वाच्या दौऱ्यात ते व्यापार आणि दहशतवादविरोधातील

अबु धाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी येथे आगमन झाले. या महत्वाच्या दौऱ्यात ते व्यापार आणि दहशतवादविरोधातील मोहिमेसारख्या महत्वाच्या क्षेत्रात सहकार्याबराबर भारताला आकर्षक गुंतवणूक करण्याचा देश म्हणून सादर करतील.आगमन होताच मोदी यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले,‘मी या दौऱ्याबद्दल खूप आशावादी आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि युएईतील संबंधांना प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास वाटतो.’ तब्बल ३४ वर्षांनंतर संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ मध्ये पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी येथे आल्या होत्या. मोदी यांचे येथील विमानतळावर आगमन होताच अबुधाबीचे राजपुत्र व त्यांच्या पाच भावांनी शिष्टाचार बाजुला ठेवून मोदी यांचे स्वागत केले.मोदी यांनी स्थानिक दैनिकात दिलेल्या मुलाखतीत सोमवारी संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख नेत्यांशी होणाऱ्या चर्चेचे स्पष्ट संकेत दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘युएई व्यापार आणि दहशतवादविरोधातील मोहिमेत भारताचा प्रमुख भागीदार व्हावा, असे आम्हाला वाटते.’ मोदी यांनी म्हटले आहे की दहशतवादासह सुरक्षा आणि लष्करीदृष्ट्या दोन्ही देशांची काळजी सारखीच आहे.(वृत्तसंस्था)