शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

सहा मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवास बंदी

By admin | Updated: June 30, 2017 12:37 IST

गुरूवारी सुप्रीम कोर्टाच्या मंजूरीनंतर इराण, लिबीया, सोमालिया, सुदान, सिरीया आणि येमेन या सहा देशातील लोकांना आता अमेरिकेत प्रवास करता येणार नाही.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 30-  सहा प्रमुख मुस्लिम देशांतील नागरीकांना आता अमेरिकेमध्ये प्रवास करता येणार नाही. गुरूवारी सुप्रीम कोर्टाच्या मंजूरीनंतर इराण, लिबीया, सोमालिया, सुदान, सिरीया आणि येमेन या सहा देशातील लोकांना आता अमेरिकेत प्रवास करता येणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा प्रमुख मुस्लिम देशांना अमेरिकेत प्रवास करण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या या निर्णयावर टीकाही झाली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या मंजूरीनंतर आता ट्रम्प यांच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. युरोपसारखी परिस्थिती होऊ नये, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा प्रमुख मुस्लिम देशांना अमेरिकेत प्रवास करण्यावर निर्बंध लादले होते. सुप्रीम कोर्ट आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांमध्ये पाच महिने सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर शुक्रवारी कोर्टाने ट्रम्प यांच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.  
 
इराण, लिबीया, सोमालिया, सुदान, सिरीया आणि येमेन या सहा प्रमुख मुस्लिम देशांना अमेरिकेत ताप्पुरती प्रवास बंदी करणं गरजेचं आहे. अमेरिकेत दहशतवादाला थारा द्यायचा नसेल तर असं करावंच लागणार,असं ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 
 
ट्रम्प यांनी सर्व शरणार्थीना अमेरिकेत १२० दिवसांसाठी बंदी घातली आहे तर इराण,लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या मुस्लीम देशातील व्यक्तींना ९० दिवस प्रवास बंदी करण्यात आली आहे. पण ज्या मुस्लीम लोकांचे जवळचे नातेवाईक म्हणजेच आई-वडील, मुलं, बहिण-भाऊ, अमेरिकेत राहतात त्यांना मात्र भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेसह जगभरातून तीव्र विरोध झाला आहे. मुस्लिमांवरील प्रवासबंदीचा निर्णय ट्रम्प यांनी मागे घ्यावा, अशी मागणी डेमोक्रॅटीक पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली होती. तसंच ट्रम्प यांच्या आदेशामुळे अमेरिकेतील विमानतळावरसुद्धा गोंधळ सुरू होता. विमान प्रवाशांच्या नाराजीची जागा संतापाने घेतली होती. त्याचा सामना विमानतळावरील अधिकाऱ्यांना करावा लागत होता. अनेक विमानतळांवर या निर्णयाने प्रभावित झालेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी वकिलांची सोय करण्यात आली होती.