शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केला सूर्याहून तिप्पट तेजस्वी कृत्रिम तारा!

By admin | Updated: February 11, 2016 02:08 IST

सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली.

बीजिंग: सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली.‘इस्टिट्यूट आॅफ फिजिकल सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आण्विक सम्मीलन तंत्राने (न्युक्लियर फ्जुजन) प्रायोगिक अणुभट्टीत ४९.९९९ दशलक्ष सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णतेचे वस्तुमान तयार करण्यात यश मिळवले. सूर्यासारख्या ताऱ्यांच्या गर्भात अशीच आण्विक प्रक्रिया निरंतर होऊन उष्णतारूपी ऊर्जा उत्सर्जित होत असते. थोडक्यात, चिनी वैज्ञानिकांनी आपल्या सूर्याहून तिप्पट तेजस्वी असा कृत्रिम तारा प्रयोगशाळेत तयार केला. ऊर्जेचा हा स्रोत भूगर्भातील उष्णतेहून ८,६०० पट अधिक तप्त होता. हा कृत्रिम तारा अस्थायी होता व अवघ्या १०२ सेकंदांनंतर तो ‘विझून’ गेला. ज्या अणुभट्टीत ही आण्विक प्रक्रिया घडवून आणली गेली तिचे आतील चेंबर एवढ्या उष्णतेत जास्त काळ टिकाव धरू शकले नाही. दुष्परिणाम न होणारा शाश्वत ऊर्जास्रोत म्हणून ‘न्युक्लिअर फ्जुजन’चे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत. चिनी वैज्ञानिकांनी सोमवारी केलेला प्रयोग हा याचाच एक भाग होता.यासाठी चीनमध्ये ईस्ट प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी सुमारे ३७ दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला. ऊर्जानिर्मिच्या बाबतीत वैज्ञानिकांना एका समस्येवर गेली १५० वर्षांत मात करता आलेली नाही. ती म्हणजे एखाद्या ऊर्जास्रोतातून ऊर्जानिर्मिती करताना खर्ची पडणाऱ्या ऊर्जेहून अधिक ऊर्जा कशी निर्माण करायची. यादृष्टीने ‘न्युक्लिअर फ्जुजन’कडे एक आश्वासक तंत्र म्हणून पाहिले जात असले तरी यातून मिळणारा ऊर्जेचा स्रोत अखंडपणे कसा सुरु ठेवता येईल, याचे कोडे वैज्ञाानिकांना अद्यापही सुटलेले नाही.नानाविध लाभांचे तंत्रज्ञानफ्युजन अणुभट्ट्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचे जैविक स्रोतांच्या तुलनेत अनेक लाभ आहेत. यातून कार्बनचे उत्सर्जन अजिबात होत नाही, यातून घातक आण्विक कचरा तयार होत नाही. अणु विखंडनाच्या (न्युक्लिअर फ्युजन) पारंपरिक तंत्रज्ञानासारखे संभाव्य धोकेही नाहीत. अशाप्रकारे निर्माण केलल्या एक किलो वजनाच्या ऊर्जासाधनातून जेवढी ऊर्जा मिळते तेवढी ऊर्जा मिळविण्यासाठी १०० दशलक्ष किलो जैविक ऊर्जासाधने जाळावी लागतील.आमच्या या प्रयोगातून मिळणारे निष्कर्ष ‘इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्स्परिमेंट रिअ‍ॅक्टर’च्या विकासात, अभियांत्रिकी तंत्रज्ञान व पदार्थविज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील पायाभूत संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचे योगदान ठरू शकेल.-वॅन युआनशी,प्रकल्प प्रमुख