शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या लष्करी शक्तीचे भारताकडून होतेय अवास्तव चित्रण

By admin | Updated: May 8, 2017 18:28 IST

चीनमधीस एका सरकारी वृत्तपत्राने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केले आहे. बिजिंगकडून होत असलेला लष्करी विकास आणि

ऑनलाइन लोकमत
बिजिंग, दि. 8 - चीनमधीस एका सरकारी वृत्तपत्राने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केले आहे. बिजिंगकडून होत असलेला लष्करी विकास आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरसंबंधीची माहिती भारताने अवास्तवरित्या मांडू नये असा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या लष्कर प्रमुखांनी देशाला चीन आणि पाकिस्तान या भविष्यातील प्रतिस्पर्ध्यांची कोंडी करण्याचा सल्ला दिला होता. 
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील विवादात चीन जाणीवपूर्वक लुडबूड करतो आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीरला मान्यता देत आहे, अशी भारताला शंका आहे. चीन आणि पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडोर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताला असे वाटत असावे. 
बिजिंग आणि इस्लामाबादमधील वाढत्या जवळीकीकडे भारत संभाव्य धोका म्हणून पाहत आहे. तसेच चीनच्या वन बेल्ट वन रोड आणिु चीन पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडॉरकडे शंकेच्या नजरेने पाहत आहे. तसेच  याचे अवास्तव चित्रण करत असल्याचा आरोपही  या लेखात करण्यात आले आहे. 
दरम्यान,  भारताच्या दबावानंतरही आम्ही चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडोर(सीपीईसी)मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कॉरिडोरच्या माध्यमातून काश्मीरही आता बीजिंगशी जोडला जाणार आहे. आम्हाला काश्मीर मुद्द्यात हस्तक्षेप करत इकोनॉमिक कॉरिडोरमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे, असे वृत्त ग्लोबल टाइम्समधून काही दिवसांपूर्वी छापून आले होते. तसेच आमचे काही ऑफिसर हे दलाई लामांना फंडिंग करत असल्याचा खुलासाही चीननं केला आहे. 
काश्मीरच्या मुद्द्यावर चीनला मध्यस्थता करण्याची इच्छा आहे. हे आमचे दीर्घकालीन धोरण असल्याचेही चीनने सांगितले होते. वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टच्या माध्यमातून चीनला काश्मीरसह प्रादेशिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी भारताच्या मदतीची आवश्यकता आहे. OBOR हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला यूरोपशी जोडण्याचा शी जिनपिंग यांचा मानस आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी) हा आर्थिक कॉरिडॉरसुद्धा या प्रकल्पाचाच एक हिस्सा आहे. OBOR या प्रोजेक्टच्या माध्यमातून सहभागी देशांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आम्हाला वाटते भारताने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावावी, असेही चीनने याआधी सांगितले होते.
या OBOR या समीटमध्ये 28 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 46 अब्ज डॉलरच्या सीपीईसी या कॉरिडॉरचा भारताच्या राजनैतिक आणि काश्मीर सीमावादाशी सरळ कोणताही संबंध नाही. या प्रकल्प फक्त आर्थिक सहकार आणि विकासासाठी आहे. काश्मीर मुद्द्यावर चीनच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असेही चीनने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता चीनला काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थता करण्याची इच्छा आहे. OBOR प्रोजेक्टमध्ये भारताने सहभाग नोंदवल्यास यातून अनेक मार्ग खुले होणार आहेत. बांगलादेश, चीन, भारत आणि म्यानमार हे देश या समीटचाच भाग आहेत. त्यामुळे भारत यासाठी सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असंही चीन म्हणाला होता.