शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या OBORला अमेरिका देणार प्रत्युत्तर, भारत ठरणार गेमचेंजर

By admin | Updated: May 24, 2017 18:35 IST

चीनची महत्त्वाकांक्षी योजना वन बेल्ट वन रोड(OBOR)नं जमिनीवरचं राजकारण पूर्णतः बदलून टाकलं आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 24 - चीनची महत्त्वाकांक्षी योजना वन बेल्ट वन रोड(OBOR)नं जमिनीवरचं राजकारण पूर्णतः बदलून टाकलं आहे. मात्र भारतानं यात सहभाग न घेतल्यानं गेल्या काही दिवसांपासून चीन भारताविरोधात आगपाखड करत आहे. आता अमेरिकाही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी नवा कॉरिडोर बनवणार आहे. 
अमेरिका चीनच्या OBORला मात देण्यासाठी दक्षिण पूर्व आशियातील दोन महत्त्वपूर्ण योजनांना पुन्हा सुरू करणार आहे. अमेरिकेच्या या योजनेत भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन न्यू सिल्क रोडचं काम पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेची घोषणा जुलै 2011मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी स्वतःच्या भाषणात केली होती. या योजनेसह दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडणारा इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक कॉरिडोरही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी अमेरिकेच्या प्रशासनाच्या पहिल्या बजेटमध्ये या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. न्यू सिल्क रोड हा खासगी-सार्वजनिक भागीदारी प्रकल्प असणार आहे. त्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आणि मध्य आशियाचा परराष्ट्र विभागही या प्रकल्पासाठी योगदान देणार आहे. न्यू सिल्क रोड या कॉरिडोर अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांमधून जाणार आहे. तसेच दुस-या बाजूला भारत- प्रशांत महासागरातील आर्थिक कॉरिडोर आहे. जो दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या प्रांताला जोडणार आहे. एनएसआर या प्रकल्पाचं महत्त्व वाढलं आहे. कारण अमेरिका अफगाणिस्तानमधील लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत देण्यावर ठाम आहे. क्लिंटन म्हणाल्या होत्या, वायू क्षेत्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना ऊर्जा पुरवण्यासाठी मदत करू शकतो.  तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून चांगल्या प्रमाणात संक्रमण महसूल मिळणार आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचा इतर देशांनाही फायदा होणार आहे. ओबामांच्या कार्यकाळात या न्यू सिल्क रोड या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काहीसा हा प्रोजेक्ट अडगळीत पडला होता. मात्र या प्रोजेक्टला अमेरिका पुन्हा चालना देणार आहे.