शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख सैनिकांची चीन कपात करणार

By admin | Updated: September 4, 2015 01:16 IST

२.३ दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. द्वितीय महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या

बीजिंग : २.३ दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. द्वितीय महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या विजयाच्या ७० व्या वार्षिक समारोहानिमित्त आयोजित लष्करी संचलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. शेजारच्या देशांसोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लष्करी शक्तिप्रदर्शन करून चीनने बाह्या सरसावल्याचे या वेळी स्पष्ट झाले.चीन आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर १४५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका अवाढव्य खर्च करतो. जगात अमेरिकेनंतर लष्करावर खर्च करणारा चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.लष्कराचा आकार छोटा करून आधुनिक शस्त्रांचा वापर वाढवून आधुनिकीकरण करण्यावर चीनने भर दिला आहे.शी यांनी सध्या चीनमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या घोषणेकडे पाहिले जात आहे. त्यांच्याकडे देशाच्या अध्यक्षस्थानासोबतच सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाचे अध्यक्षपद आणि लष्कराचेप्रमुख पदही आहे.लष्कराची पुनर्रचना केली जात असून, ३० लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात आहे. या अधिकाऱ्यांत केंद्रीय लष्करी आयोगाच्या माजी उपाध्यक्षांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पद स्वीकारल्यापासून त्यांनी आधुनिकीकरणावर भर दिला आहे. त्यात लष्करी अभ्यास, आधुनिक शस्त्रास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक विमाने, विमानवाहू जहाजे यांच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे.यावेळी शक्तिप्रदर्शन करताना ८० टक्के लष्करी सामग्री संचलनात जगासमोर आणण्यात आली. पाकिस्तान आणि रशियासह १७ देशांच्या एक हजार विदेशी सैनिकांनी संचलनात सहभाग नोंदविला. २०० लढाऊ विमानांनी अवकाशात कवायती केल्या. माजी अध्यक्ष जियांग जेमिन, हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष पुतीन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क-जीन-हाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, भारताचे विदेश राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग यांच्यासह ३० देशांचे नेते यावेळी उपस्थित होते.