शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद लोक ओळखण्यास चीनचे रोबो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 04:15 IST

आंगडोंग प्रांतातील तीन बंदरांमध्ये संशयास्पद लोकांचा शोध घेऊन तसा इशारा देणारे दहा बुद्धिमान रोबो (यंत्रमानव) तैनात केले

बीजिंग : चीनने आपल्या दक्षिण गुआंगडोंग प्रांतातील तीन बंदरांमध्ये संशयास्पद लोकांचा शोध घेऊन तसा इशारा देणारे दहा बुद्धिमान रोबो (यंत्रमानव) तैनात केले आहेत. विमानतळावर अशा रोबोट्सचा सुरक्षेसाठी वापर झाल्यानंतर कस्टम्स अधिकारी म्हणून हे रोबो काम करतील. बंदरांवर चीनच्या कस्टम्स विभागाने प्रथमच असे बुद्धीमान रोबो वापरले असून ही दहा जणांची त्यांची पहिली तुकडी आहे. शिओ हाय या नावाचा हा रोबो अतिशय आधुनिक असून तो ऐकू, बोलू शकतो. तो शिकू शकतो, बघू शकतो व चालूही शकतो, असे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले. हा रोबो कँटोनीज, मँडारीन, इंग्लिश आणि जपानी भाषेसह २८ भाषा आणि स्थानिक भाषांमध्ये उत्तर देऊ शकतो. त्यासाठी विशेष कस्टम्स डाटाबेस वापरण्यात आला आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे हे रोबो संशयास्पद माणसे ओळखून सावधगिरीचा इशाराही देतील, असे गोंगबेई कस्टम्सचे संचालक झाओ मिन यांनी सांगितले. गुआंगडोंग प्रांतातील शेनझेन या सगळ््यात जास्त गर्दीच्या विमानतळावर गेल्या महिन्यात चीनने सुरक्षेसाठी रोबोची पहिल्यांदाच नियुक्ती केली होती. ‘द अन्बोट’ या नावाच्या सुरक्षा रोबोने डिपार्चर हॉलमध्ये २४ तास सुरक्षेचे काम केले. निर्यात घसरल्यामुळे चीन सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीन स्वस्तातल्या वस्तु उत्पादनातून दूर होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानात फार मोठी गुंतवणूक करीत आहे. (वृत्तसंस्था)