शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी थेट संबंध नाही- चीन

By admin | Updated: April 18, 2017 17:39 IST

भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 18 - भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी)च्या आर्थिक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचा खुलासा चीननं केला आहे. तसेच भारतानं वन बेल्ट-वन रोड (OBOR) या प्रकल्पात सहभागी व्हावं, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांनी केलं आहे. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आम्ही भारताचं वन बेल्ट-वन रोड प्रकल्पात नेहमीच स्वागत असेल, असंही झी जिनपिंग म्हणाले आहेत. चीनचे OBOR या प्रोजेक्टसाठी 14 ते 15 मे रोजी समीट होणार आहे. OBOR हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला यूरोपशी जोडण्याचा शी जिनपिंग यांचा मानस आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी) हा आर्थिक कॉरिडॉरसुद्धा या प्रकल्पाचाच एक हिस्सा आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, OBOR समीटमध्ये भारताचा कोणताही नेता उपस्थित राहणार नाही. मात्र भारताला पाहिजे असल्यास ते स्वतःचा प्रतिनिधी पाठवू शकतात. आम्ही भारताच्या प्रतिनिधी किंवा व्यावयासिक समुदाय सदस्याचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. OBOR या प्रोजेक्टच्या माध्यमातून सहभागी देशांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आम्हाला वाटतं भारतानं या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावावी. या OBOR या समीटमध्ये 28 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 46 अब्ज डॉलरच्या सीपीईसी या कॉरिडॉरचा भारताच्या राजनैतिक आणि काश्मीर सीमा वादाशी सरळ कोणताही संबंध नाही. या प्रकल्प फक्त आर्थिक सहकार आणि विकासासाठी आहे. काश्मीर मुद्द्यावर चीनच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. OBOR प्रोजेक्टमध्ये भारतानं सहभाग नोंदवल्यास यातून अनेक मार्ग खुले होणार आहेत. बांगलादेश, चीन, भारत आणि म्यानमार हे देश या समीटचाच भाग आहेत. त्यामुळे भारत यासाठी सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असंही वांग म्हणाले आहेत.