शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

चीनने कैलास मानसरोवर यात्रेसाठी खुला केला नथुला खिंडीतील मार्ग

By admin | Updated: June 23, 2015 00:02 IST

चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दुसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुला खिंडीतून जातो. भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी

नैदुलिया (चीन) : चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दुसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुला खिंडीतून जातो. भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी आज या मार्गाने रवाना झाली. चीन व भारत यांच्यातील मैत्रीअंतर्गत विश्वासनिर्मितीसाठी चीनचा हा एक उपाय आहे. हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून ४ हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू जाऊ शकतील. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, २०१३ साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब व नादुरुस्त झाला आहे.सिक्कीमच्या सीमेवरून ४४ भारतीय यात्रेकरू आज या मार्गावरून पुढे गेले. चिनी अधिकाऱ्यांनी तिबेटमध्ये त्यांचे स्वागत केले. रविवारी चीनचे भारतातील राजदूत ले येचुंग भारतीय सीमेवरून प्रथमच या मार्गावर आले. या मार्गावर येणारे ते पहिले चिनी अधिकारी ठरले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कैलास यात्रेसाठी नवा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते तेव्हापासून या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. उत्तराखंड व नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नथुला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना १५०० कि.मी. चा मार्ग बसने जाता येणार आहे. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली आहे. ही यात्रा परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते व १ हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. १८ तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा २३ दिवसांची असून १९ दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणशी १.८० लाख रुपये असतो.