शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट

By जयदीप दाभोळकर | Updated: January 17, 2021 11:02 IST

नेपाळच्या वक्तव्यानंतर चीननं व्यक्त केली होती नाराजी

ठळक मुद्देनेपाळकडून UNSC मध्ये भारताच्य स्थायी सदस्यत्वासाठी समर्थनचीनच्या राजदूतांनी घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट

नेपाळनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यात्वाचं समर्थन केलं आहे. यानंतर चीननंनेपाळसंदर्भात आपली नाराजी जाहीर केली. नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली हे गुरूवारी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यानंतर ग्यावली यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेटही घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. परंतु ज्यावेळी माध्यमांमध्ये नेपाळद्वारे युएनएससीमध्ये भारताच्या स्थायी सदस्यात्वाला समर्थन देण्याचं वृत्त झळकलं, त्याच दिवशी संध्याकाळी चीनच्या राजदुतांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतली. तसंच त्यांनी याबद्दल आपली नाराजीही व्यक्त केली. हस्तक्षेप स्वीकारणार नाही"नेपाळ आपल्या देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. आपल्या अंतर्गत समस्यांचं निराकरण करण्यासाठी नेपाळ सक्षम आहे," असं ग्यावली म्हणाले. नेपाळची संसद भंग केल्यानंतर शेजारी देशात उपस्थित झालेल्या राजकीय संकटातील चीनच्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर ग्यावली यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. दोन्ही देशांतील सीमाप्रश्नावर बोलताना ग्यावली यांनी भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश त्याचा तोडगा काढण्यासाठी सक्षम असून त्यावर विचारही सुरू असल्याचं म्हणाले. "भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत आपले संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांसोबत असलेल्या संबंधांची आपण तुलना करणार नाही," असंही ते म्हमाले. यावेळी ग्यावली यांना चीनकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांविषयी प्रश्न विचारण्यात आला. "आम्ही देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. आम्ही आमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सक्षम आहोत. शेजारी देश असल्यामुळे काही चिंता किंवा प्रश्न असू शकतात. परंतु आम्हाला कोणाचाही हस्तक्षेप मंजुर नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :chinaचीनNepalनेपाळXi Jinpingशी जिनपिंगIndiaभारतBorderसीमारेषाPoliticsराजकारण