शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनने अमेरिकेच्या 12 गुप्तहेरांची केली हत्या: रिपोर्ट

By admin | Updated: May 21, 2017 12:23 IST

अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या 12 एजंट्सची चीनमध्ये हत्या करण्यात आली किंवा त्यांना कैद करण्यात आल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 21 - अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या 12 एजंट्सची चीनमध्ये हत्या करण्यात आली किंवा त्यांना कैद करण्यात आल्याचं वृत्त आहे. वर्ष 2010 आणि 2012 मध्ये या हत्या झाल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियात अमेरिकी हेरांची हत्या झाली होती. अमेरिकेतील दोन अधिकाऱ्यांनी ही गोपनीय माहिती रशियाला दिली होती. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुसरी घटना असल्याचे जाणकार सांगतात.

अमेरिकेतील जवळपास 10 अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 2010 ते 2012 या कालावधीत चीनने सीआयएच्या 18 ते 20 एजंट्सची हत्या केली किंवा त्यांना कैद. यातील एका एजंटची त्याच्या सहकाऱ्यासमोरच हत्या करण्यात आली होती. सीआयएला इशारा देण्यासाठी हे कृत्य करण्यात आले होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चीन सरकारने 2010 च्या अखेरपासून चीनमधील अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे जाळे निष्क्रीय केले असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  अजूनही या घटनांचा तपास सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले.  याबाबत द न्यूयॉर्क टाइम्सने सीआयएच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
 
सीआयएमधूनच काहीजण चीनला माहिती पुरवत असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे तर काहींनी सीआयए ज्या तंत्रज्ञानाद्वारे आपल्या गुप्तचरांसोबत चर्चा करते तेच तंत्रज्ञान चीनने हॅक केल्याची शक्यता वर्तवली आहे.