चीनमध्ये जगातील सर्वात मोठ्या पूलाचे काम सुरू आहे. या पुलाला हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज असे नाव देण्यात आले आहे आणि तो बांधण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर या पुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशातील ग्रामीण भागांना जोडणी देण्याव्यतिरिक्त, हा पूल पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण देखील असणार आहे.
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
पूल बांधण्यासाठी अंदाजे २८० मिलियन डॉलर खर्च आला. पुलाची लांबी एक मैल लांब आणि आयफेल टॉवरपेक्षा सुमारे २०० मीटर उंच आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे या पुलावरून एक तासाचा प्रवास फक्त एका मिनिटात करता येणार आहे. चीनने या पुलाचे बांधकाम फक्त तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये सुरू केले होते. या वर्षी जूनपासून तो पूल सर्वसामान्यांना वापरता येणार आहे.
याबाबत चीनमधील झांग शेंगलिन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "हा सुपर प्रोजेक्ट चीनच्या अभियांत्रिकी क्षमता जगासमोर आणेल आणि गुइझोऊचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनण्याचे ध्येय साध्य होईल. पूलाच्या स्टील स्ट्रक्चरचे वजन सुमारे २२,००० मेट्रिक टन आहे. हे तीन आयफेल टॉवर्सच्या बरोबरीचे आहे आणि ते फक्त दोन महिन्यांत बसवण्यात आले, असंही त्यांनी सांगितले.