शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:10 IST

China News: चीनने पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान सीमेजवळ शिनजियांग प्रांतात २६ मार्च रोजी सानलिंग हा एक नवीन प्रशासकीय विभाग (काउंटी) स्थापन केला आहे.

बीजिंग - चीनने पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान सीमेजवळ शिनजियांग प्रांतात २६ मार्च रोजी सानलिंग हा एक नवीन प्रशासकीय विभाग (काउंटी) स्थापन केला आहे. फुटीरवादी उइगर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी व अरुंद वाखान कॉरिडॉरमधील सुरक्षा वाढवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.

काराकोरम पर्वतरांगेजवळ पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून हा विभाग असून, सामरिकदृष्ट्या ही काउंटी महत्त्वाची ठरणारी आहे. चीनने स्थापन केलेली ही तिसरी नवीन काउंटी आहे.

अरुणाचलबाबत चीनच्या प्रयत्नांना भारताने फटकारलेअरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांबद्दल भारताने रविवारी कठोरपणे फटकारले. असे दावे किंवा निराधार कथा हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे वास्तव बदलू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे. चीनने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये बाधा आणणाऱ्या अशा कृतीपासून दूर राहावे, असा सल्लाही भारताने दिला आहे.

भारताने नोंदवला निषेधभारताने गेल्या वर्षी हेआन आणि हेकांग काउंटींच्या निर्मितीवर चीनकडे निषेध नोंदवला होता. कारण या दोन्ही विभागातील काही भाग लडाख या केंद्रशासित प्रदेशात येतो. हेआनमध्ये अक्साई चीन पठाराचा बराच भाग येतो. 

तैवानसाठी थेट विमानसेवाचीन शेजारी देश तैवानवर आपला अधिकार सांगत असल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध संपुष्टात आले होते. मात्र, चीनने तैवानसंदर्भात रविवारी महत्त्वाची घोषणा केल्याने संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय