शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

चीन करणार ५ लाख नोकऱ्यांची कपात

By admin | Updated: March 2, 2017 03:55 IST

चीनने कोळसा आणि पोलाद यासह अन्य अवजड उद्योग क्षेत्रातील ५ लाख नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीजिंग : आर्थिक मंदीचा फटका सहन करीत असलेल्या चीनने कोळसा आणि पोलाद यासह अन्य अवजड उद्योग क्षेत्रातील ५ लाख नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे मनुष्यबळ विकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री यीन वेईमीन यांनी ही घोषणा केली. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे.चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने या संबंधीचे वृत्त दिले आहे. वेईमीन यांनी सांगितले की, ‘यंदा नोकरी गमवावी लागलेल्या पाच लाख लोकांना अन्यत्र हलविण्याची योजना सरकारने आखली आहे. चीनचा बेरोजगारीचा दर यंदा ४.0२ टक्क्यांवर आहे. आर्थिक मंदी असतानाही तो निर्धारित लक्ष्याच्या मर्यादेतच आहे.’जगातील एकूण पोलाद उत्पादनापैकी अर्धेअधिक पोलादाचे उत्पादन चीनमध्ये होते. जगातील पोलादाची मागणी कमी झाल्यामुळे राक्षसी क्षमता असलेला चीनमधील हा उद्योग संकटात सापडला आहे.यीन यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी शहरी भागात १३.१४ दशलक्ष नवे रोजगार दिले गेले. सरकारचे आकडे विश्वासार्ह आहेत. नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅस्टिक्सने केलेल्या सर्वेक्षणातूनही हीच आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये २0११ पासून सातत्याने मंदी आहे. त्यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.’