शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार बनला प्रमुख पाहुणा

By admin | Updated: May 4, 2014 14:21 IST

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला पाकिस्तानमधील वकिलांच्या बार असोसिएशनने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याची संतप्त घटना समोर आली आहे.

 ऑनलाइन टीमलाहोर, दि. ४ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला पाकिस्तानमधील वकिलांच्या बार असोसिएशनने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याची संतप्त घटना समोर आली आहे. या विरोधात पाकिस्तानमधील वकिलांनीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. लाहोर उच्च न्यायालयातील बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जमात ए दावा या संघटनेचे प्रमुख व मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार हाफीज सईदला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात सईदने भारतातील निवडणूक, आयएसआयची भूमिका, काश्मीर प्रश्न, पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे अशा विविध विषयांवर भाषण दिल्याचे जमात ए दावा संघटनेचे प्रवक्ते आसीफ खुर्शीद यांनी सांगितले. मात्र वकिल संघटनेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंध असलेल्या व दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या सईदला बोलवल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. लाहोर उच्च न्यायालयातील काही ज्येष्ठ वकिलांनीच या कृतीचा निषेध दर्शवला आहे. सईदला बोलवून वकिल संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर काय संदेश द्यायचा आहे असा प्रश्नच एका वकिलाने उपस्थित केला आहे. वकिल संघटना सईदला राष्ट्रीय नेता मानतात असा चुकीचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल अशी भितीही एका वकिलाने वर्तवली आहे.