शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोपच्या सल्लागारावर व्यभिचाराचे आरोप

By admin | Updated: June 30, 2017 00:38 IST

कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि आॅस्ट्रेलियातील कॅथलिक चर्चचे ज्येष्ठ

सिडनी : कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि आॅस्ट्रेलियातील कॅथलिक चर्चचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्डिनल जॉर्ज पेल यांच्याविरुद्ध आॅस्ट्रेलियन पोलिसांनी बाललैंगिक शोषणाचा आरोप ठेवून तपास सुरू केला आहे. व्हिक्टोरिया राज्याचे पोलीस उपायुक्त शेन पॅटन यांनी सांगितले की, कार्डिनल पेल यांच्याविरुद्ध मेलबर्न दंडाधिकारी कार्यालयात आरोपपत्र दाखल झाले असून पेल यांना १८ जुलै रोजी हजर होण्याचे समन्स काढले आहे. या घटना जुन्या आहेत व संबंधितांनी त्याच्या तक्रारी आता केल्या आहेत, असे ते म्हणाले.७२ वर्षांच्या कार्डिनल पेल यांचे वास्तव्य व्हॅटिकन, रोम येथे आहे. एक निवेदन प्रसिद्ध करून या आरोपांना सामोरे जाण्यासाठी आपण लवकर आॅस्ट्रेलियात येऊ व आरोप खोडसाळ व निराधार असल्याचे न्यायालयात सिद्ध करू, असे पेल म्हणाले.याआधी आॅस्ट्रेलियात पेल मेलबर्नचे व नंतर सिडनीचे आर्चबिशप होते. त्यांच्या क्षेत्रातील अनेक धर्मगुरूंवर असेच आरोप झाले होते. पेल यांनी त्यांची चौकशी पक्षपातीपणाने करून चर्चचे नाव खराब होऊ नये म्हणून धर्मगुरूंना पाठीशी घातले, असे आरोप त्या वेळी झाले होते. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया आणि व्हॅटिकन यांच्यात कैदी प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे समन्सनुसार कार्डिनल पेल आले नाहीत तर त्यांना खटल्यासाठी कसे आणायचे हा प्रश्न आहे.शिवाय जगभर कॅथलिक चर्चवर लैंगिक शोषणाचे व त्यावर पांघरूण घालण्याचे वाढते आरोप झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी यापुढे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यामुळे आता स्वत:च्या निकटवर्ती उच्चपदस्थ वर्तुळात असलेल्या कार्डिनल पेल यांच्या प्रकरणात पोप काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे.