इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पाकिस्तानची बाजू अॅटर्नी जनरल अश्तार औसाफ मांडणार आहेत. हेरगिरी केल्याच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गेल्या १० एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हेग येथील निबंधकांना औसाफ हे पाकिस्तानचे प्रतिनिधी असतील. परराष्ट्र व्यवहार महासंचालक डॉ. मोहम्मद फैसल हे पूर्वीप्रमाणेच सहप्रतिनिधी असतील. भविष्यात पाक आणि आयसीजे यांच्यात माहितीची देवाणघेवाण अॅटर्नी जनरल यांच्यामार्फत होईल.
जाधव प्रकरणात पाकतर्फे अॅटर्नी जनरल मांडणार बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 01:38 IST