शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवू शकतो? निवडणूक आयोग म्हणाले,'आम्ही स्वतंत्र आहोत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:24 IST

बांगलादेशात शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवू शकतो. बांगलादेशातील निवडणूक आयोगाने याबाबतीत भाष्य केले आहे.

बांगलादेशात शेख हसीना यांचा पक्ष आता निवडणूक लढवू शकतो. याबाबत आता बांगलादेशातील निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे.मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसीरुद्दीन यांनी म्हटले आहे की, सरकार किंवा न्यायव्यवस्था बंदी घालत नाही तोपर्यंत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग निवडणुकीत भाग घेऊ शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सोमवारी चितगाव सर्किट हाऊस येथे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली.

एएमएम नसीरुद्दीन म्हणाले की, निवडणूक आयोग पूर्ण स्वातंत्र्याने काम करतो आणि कोणत्याही बाह्य दबावाला सामोरे जात नाही.  निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सीईसीने मागील निवडणुकांमध्ये बनावट मतदारांचा मुद्दा देखील मान्य केला आणि मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाल्यामुळे मतदार नोंदणी कमी झाली.

मतदार यादी अपडेट करण्याचे काम लवकरच सुरू करण्याच्या योजनेची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. हे काम सहा महिन्यांत होणे अपेक्षित आहे. ५ ऑगस्टपासून निवडणूकविषयक बाबींवर राष्ट्रीय सहमती वाढवण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मागील पॅटर्नवर यावेळी  निवडणुका होणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने म्हटले होते की, मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी मतदानाचे किमान वय १७ वर्षे ठेवण्याच्या सूचनेमुळे निवडणूक आयोगावर दबाव येईल आणि निवडणूक प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.