शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन, अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:50 IST

अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली/बीजिंग : अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे. चीननेही अमेरिकी वस्तूंवर ५० अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर प्रस्तावित केले आहेत. या घडामोडींमुळे अमेरिका आणि भारत-चीन यांच्यात व्यापार युद्धच छेडले गेले आहे.अमेरिकेने गेल्या महिन्यात स्टीलवर २५ टक्के, तर अल्युमिनियमवर १० टक्के आयात कर लावला होता. या करामुळे भारताला २४१ दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेला टार्गेट करून ३० वस्तूंवरील आयात शुल्कातील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेला या निर्णयाची माहिती भारताने अधिकृतरीत्या कळविली आहे. भारत सरकारच्याा सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने आमच्या वस्तूंवर जेवढ्या रकमेचे कर लावले आहेत, तेवढ्याच रकमेचे कर आम्हीही प्रस्तावित केले आहेत.भारताकडून आयात कर लावण्यात येणाऱ्या वस्तूंत मोटार सायकली, ठराविक लोखंड, पोलादी वस्तू, बोरिक अ‍ॅसिड, मसूर डाळ, चणे, ताजी सफरचंदे, अक्रोड, बदाम, शुद्ध केलेले पामतेल, ८०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटार बाइक्स, वैद्यकीय निदानासाठी वापरली जाणारी घटकद्रव्ये, आटा असलेले नट यांचा समावेश आहे.जागतिक व्यापार संघटनेच्या ‘सुरक्षा उपाय करारा’च्या अधीन राहून भारताने हे कर प्रस्तावित केले आहेत. अमेरिकेच्या आयात करास भारताने याआधीच आक्षेप घेतला होता. अमेरिकेने आयात कराचा निर्णय कायम ठेवल्यास आम्हीही २१ जून २०१८ पासून आयातकराची सवलत काढून घेऊ, असे भारताने म्हटले होते.>चीनकडून ६५९ वस्तूंवर अतिरिक्त करअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक आदेश जारी करून चिनी वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावला होता. या करांमुळे चीनला ५० अब्ज डॉलरचा फटका बसणार आहे. चीनने आज अमेरिकी वस्तूंवर तेवढ्याच रकमेचे कर लावून फिट्टमफाट केली. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले की, अमेरिकेच्या ६५९ वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. त्यातून चीनला ५० अब्ज डॉलरचा लाभ होईल. चीनने लावलेल्या करांत कृषी उत्पादने, वाहने, जल उत्पादने, रासायनिक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि ऊर्जा उत्पादने यांचा समावेश आहे.