शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये सौदी दूतावास जाळला

By admin | Updated: January 4, 2016 02:58 IST

सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला मृत्युदंड दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी इराणमधील मशहाद या शहरात सौदी अरेबियाच्या दूतावासास आग लावली.

तेहरान : सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला मृत्युदंड दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी इराणमधील मशहाद या शहरात सौदी अरेबियाच्या दूतावासास आग लावली. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने नंतर या गर्दीला हटविण्यात आले. इराणमधील एका समाचार एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे. सौदीतील ५६ वर्षीय धर्मगुरू निम्र अल निम्र यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २०११ मध्ये निम्र यांनी सरकारविरोधी आंदोलन केले होेते. या आंदोलनाचे ते प्रमुख होते. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आल्यानंतर इराण आणि इराकच्या शिया समुदायात संतापाची लाट उसळली आहे.समाचार एजन्सीने सांगितले की, दूतावासातून आगीचे लोळ बाहेर येत होते. आंदोलक थेट दूतावासाच्या आत गेले होते; पण पोलिसांनी नंतर त्यांना तेथून बाहेर हटविले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ठिकठिकाणी पोलीस होते आणि त्यांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटविले. या आंदोलकांपैकी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून हटविण्यापूर्वी आंदोलक दूतावासाच्या छतावरही गेले होते. शियाबहुल इराण व सुन्नीबहुल सौदी अरेबियात संघर्ष आहे. 1 तेहरान : सौदीत एका शिया धर्मगुरूंना मृत्युदंडाची शिक्षा दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे की, ज्यांनी हे कृत्य केले त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. 2 इराक, लेबनान, सिरियातूनही या फाशीच्या शिक्षेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदीने काल याबाबत घोषणा करताना सांगितले होते की, शिया धर्मगुरू शेख-निम्र व अन्य ४६ जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे. 3 यातील अनेक जण अल कायदाशी संबंधित असल्याचे सांंगण्यात आले आहे. सौदीच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे त्यात शिया आणि सुन्नी या दोन्ही समुदायांचे लोक होते.