शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा मार्कोसचे ‘हीरो’ म्हणून होणार दफन

By admin | Updated: November 9, 2016 06:21 IST

देशाच्या संपत्तीची अलोट लूट करण्याखेरीज लाखो देशवासियांचा अनन्वित छळ केल्याने ‘क्रूरकर्मा’ ठरलेले

मनिला: देशाच्या संपत्तीची अलोट लूट करण्याखेरीज लाखो देशवासियांचा अनन्वित छळ केल्याने ‘क्रूरकर्मा’ ठरलेले फिलिपीन्सचे हुकूमशहा फर्निनांड मार्कोस यांचे मनिलाच्या दक्षिणेस असलेल्या राष्ट्रनेत्यांच्या दफनभूमीत दफन करण्यास त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखविला.मार्कोस यांचा दफनविधी हा फिलिपीन्समध्ये संवेदनशील विषय ठरला होता. देशवासीयांमध्ये त्यावरून उभी फूट पडली होती. न्यायालयाच्या निकालाने या वादावर पडदा पडेल, अशी अपेक्षा आहे. मार्कोस यांचे चिरंजीव फर्निनांड मार्कोस ज्यु. यांनी ‘मोठ्या मनाने दिलेला निकाल’ अशा शब्दांत या निकालाचे स्वागत केले सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस बहुमताने राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या रॉड्रिगो दुतेर्ते यांनी मार्कोस यांचे सन्मानाने दफन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले होते. त्यानुसार, त्यांनी मार्कोस यांचे दफन ‘हीरोज सेमिट्री’मध्ये करण्याचा आदेश गेल्या आॅगस्टमध्ये दिला होता. मार्कोस यांच्या सत्ताकाळात छळ झालेल्यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ९ विरुद्ध ५ अशा बहुमताने त्या फेटाळून लावताना व राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार असल्याचे जाहीर केले.राष्ट्राध्यक्ष दुतेर्ते यांच्या वतीने निकालाचे स्वागत करताना अध्यक्षीय प्रवक्ते अर्नेस्टर अ‍ॅबेल्ला यांनी म्हटले की, यामुळे हा वादविषय कायमचा संपुष्टात येऊन देश शांततेच्या व सर्वांसाठी न्याय्य अशा विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ शकेल, अशी आशा आहे. शंभराहून अधिक मार्कोस समर्थकांनी हातात फिलिपीन्सचा राष्ट्रध्वज घेऊन व मार्कोस यांचे चित्र असलेला टी-शर्ट अंगात घालून निकाल जाहीर होताच न्यायालयाबाहेर जल्लोश केला, परंतु विरोधकांची प्रतिक्रियाही तेवढीच तीव्र होती. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या ‘बयान’ (राष्ट्र) या संघटनेचे महासचिव रेनॅटो रेयेस म्हणाले, ‘आजचा दिवस केवळ वाईटच नाही, तर मार्कोस यांच्या हुकुमशाही वरवंट्याने भरडले गेलेल्यांसाठी व ज्या पिढ्यांनी अत्यंत निर्दयी अशा फॅसिस्ट राजवटीच्या झळा सोसल्या, त्यांच्यासाठी आक्रोशाचा आहे. भावी पिढ्यांच्या नशिबी कधीही असा काळाकुट्ट कालखंड येऊ नये यासाठी आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू. (वृत्तसंस्था)