शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या ‘इसिस’विरोधी कारवाईला ब्रिटनचाही पाठिंबा

By admin | Updated: September 28, 2014 03:02 IST

इस्लामिक स्टेटविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईला ब्रिटन, बेल्जियम आणि डेन्मार्कने शुक्रवारी पाठिंबा दिला.

लंडन : इस्लामिक स्टेटविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईला ब्रिटन, बेल्जियम आणि डेन्मार्कने शुक्रवारी पाठिंबा दिला. या पाठिंब्यानुसार इराकमध्ये लष्करी कारवाई होईल; परंतु अमेरिकेला सिरियात थेट हस्तक्षेप करता येणार नाही, अशी मर्यादाही या देशांनी घातली. 
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हजारो मुलतत्ववादी तयार ठेवले असून त्यांनी इराक आणि सिरियाचा फार मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. या तीन देशांचा पाठिंबा तसा फार मोठा म्हणता येणार नसला तरी बराक ओबामा यांच्या प्रयत्नांना त्यामुळे बळ मिळणार आहे. अमेरिकेसोबत याआधीच पाच अरब राष्ट्रे, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी शनिवारी हा निर्णय घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. 
524 सदस्यांनी इराकमध्ये अमेरिकेसोबत हवाई हल्ले करायला एकमुखाने पाठिंबा दिला, तर 43 सदस्यांनी विरोध केला. काही सदस्यांनी मतदानात भागच घेतला नाही. 
तत्पूर्वी, कॅमेरून यांनी इस्लामिक स्टेटविरुद्धची लष्करी कारवाई अनेक वर्षे चालू शकेल, असे म्हटले होते व संसद सदस्यांनी कारवाईसाठीच्या ठरावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. अॅलन हेलिंग आणि जॉन कॅन्टिली हे ब्रिटिश नागरिक त्यांच्या आज ताब्यात आहेत.  (वृत्तसंस्था)
 
डेव्हीड कॅमेरून यांनी आयएसच्या दहशतवाद्यांना ‘मानसिक समतोल बिघडलेले दहशतवादी’ म्हटले आहे.
 
4न्यूयॉर्क :  इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यासाठी अमेरिका स्थापन करीत असलेल्या जागतिक आघाडीत भारत सामील होण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील या आघाडीत 4क् देश सामील झाले आहेत. 4क् भारतीय अजूनही इराकमध्ये बंदिवान असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत या आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही, असे सूत्रंनी सांगितले.
4 तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यासाठी मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. दहशतवादाबाबत भारताची भूमिका सर्वश्रुत आहे. इसिसच्या ताब्यातील 46 नर्सेसची सुटका करण्यात आम्हाला यश आले. तथापि, 4क् भारतीय अजूनही त्यांच्या ताब्यात ओहत. मोसूल नजीकच्या एका प्रकल्पावर काम करणा:या या भारतीयांचे जूनमध्ये या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.