शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

या ब्रिटीश पंतप्रधानांनीही मोडली सौदी अरेबियाची प्रथा( फोटो स्टोरी)

By admin | Updated: April 5, 2017 16:29 IST

सौदी अरेबियाच्या दौ-यावर असलेल्या ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी सौदीची प्रथा मोडून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

 ऑनलाइन लोकमत 

रियाध, दि. 5 - सौदी अरेबियाच्या दौ-यावर असलेल्या ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी सौदीची प्रथा मोडून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सौदीमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाताना डोक्यापासून पायाच्या अंगठयापर्यंतचा भाग वस्त्रामध्ये झाकून ठेवावा लागतो. 
 
सौदीमध्ये महिलांसाठी अत्यंत कठोर नियम आहेत. तिथे मुस्लिम महिला हिजाबमध्ये डोके आणि केस झाकून ठेवतात. थेरेसा मे यांनी सौदीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानण्यास नकार देताना आपले केस वस्त्रामध्ये झाकून घेण्यास नकार दिला. 
 
सौदीमध्ये डोक्यावरचे केस झाकण्यास नकार देणा-या मे पहिल्या महिला नाहीत यापूर्वी अनेक पाश्चात्य महिला नेत्यांनी ही प्रथा मानण्यास नकार दिला आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर नव्याने व्यापारी करार करण्यासाठी थेरेसा मे सध्या आखाती देशाच्या दौ-यावर आहेत. 
 
मिशेल ओबामा 2015 
सौदीचे राजे किंग अब्दुल्लाह यांच्या निधनानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाम यांच्यासोबत माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा सौदीच्या राजपरिवाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मिशेल यांनी सौदीचे राजे अब्दुल अझीझ अल सौद यांच्याबरोबर केलेल्या हस्तांदोलनावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. मिशेल यांनी यावेळी आपले डोके आणि केस झाकले नव्हते. 
हिलरी क्लिंटन 2012 
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री म्हणून हिलरी क्लिंटन सौदीच्या दौ-यावर गेल्या त्यावेळी त्यांनी आपले डोके आणि केस वस्त्रामध्ये झाकले नव्हते. 
लॉरा बुश 2007 
सौदी अरेबियातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी लॉरा बुश यांनी  2007 मध्ये सौदीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सुद्धा डोके आणि केस झाकणारा हिजाब घेतला नव्हता.
अँजला मर्केल 2010 
जर्मनीच्या चांसलर अँजला मर्केल यांनी 2010 मध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला. त्यावेळी जर्मनी-सौदी आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये सहभागी होताना त्यांनी डोक्यावरचे केस झाकणार हिजाब घातला नव्हता.