लंडन : सर्वाधिक वजन असलेली व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या कार्ल थॉम्पसन यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वजन ४१२ किलोग्रॅम एवढे होते. कार्ल थॉम्पसन दिवसाला १० हजार कॅलरी एवढी ऊर्जा असलेले अन्न सेवन करीत असे. केन्य येथील राहत्या घरी रविवारी त्यांचे निधन झाले. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या पथकाला कार्ल यांचा मृतदेह घराबाहेर काढण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांचा मृतदेह घराबाहेर काढण्यासाठी अनेक तास लागले. (वृत्तसंस्था)