शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: June 24, 2016 12:09 IST

ब्रिटनमधील 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48.1 टक्के लोकांनी राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 24 - ब्रिटनमधील जनतेने ऐतिहासिक कौल देत युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपिअन महासंघात राहावं की नाही ? यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या बाजूने कौल दिला आहे. ब्रिटनमधील 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48.1 टक्के लोकांनी राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिलं आहे. हा ऐतिहासिक निकाल असून याचा परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर होणार आहे.. 
 
जनमत चाचणीत 4 कोटी 65 लाख 1 हजार दोनशे 41 (4,65,01,241) म्हणजेच 71.9 टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. ब्रिटनच्या निवडणुकीत 1992 पासून झालेल्या मतदानाचा हा उच्चांक आहे.
 
ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी ही जनमत चाचणी झाली. याआधी 2014 साली स्कॉटलंडनं ब्रिटनमध्ये राहावं की नाही, यासाठी जनमत चाचणी झाली होती. तर 1975 साली झालेल्या जनमत चाचणीत ब्रिटननं युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीत राहण्याच्या बाजूनं कौल दिला होता. पण त्यानंतरच्या काळात युरोपियन राष्ट्रसंघटनेचं रूप बरंच बदललं आहे. हे बदल आजच्या ब्रिटनला मान्य आहेत का, हे पडताळून पाहण्यासाठी ही जनमत चाचणी घेण्यात आली.
 
ब्रिटिश आणि एक्झिट या शब्दांना एकत्र करून 'ब्रेक्झिट' हा शब्द तयार झाला आहे. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून एक्झिट असा त्याचा अर्थ होतो. युरोपियन युनियन हा 28 देशांचा समूह असून, त्यात पश्चिम युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या मुख्य देशांचा समावेश आहे. या 28 देशांचे नागरिक इतर कुठल्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवास आणि व्यापार, नोकरी करू शकतात. त्यासाठी युरोपियन युनियनमध्ये युरो हे स्वतंत्र चलनही अस्तित्वात आहे.
 
 
लंडन आणि स्कॉटलंडने राहावं यासाठी मतदान केलं आहे. मात्र उत्तर इंग्लंडमधील निकाल विरोधात गेले आहेत. दरम्यान ब्रेक्झिटमुळे पाऊंडने 31 वर्षातील निच्चांक गाठला होता. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्सवरही याचा परिणाम झाला असून 1000 अंकांनी गडगडला होता. 26 हजाराच्या खाली सेन्सेक्स आला होता. निफ्टी आणि रुपयामध्येदेखील घसरण झाली होती. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. 
 

भारतावर परिणाम

भारत, पाकिस्तान, बांगला देशातील उद्योजकांचा बाहेर पडण्याच्या भूमिकेला पाठिंबा आहे. कारण महासंघातील स्थलांतरितामुळे आशियाई लोकांना येथे नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. महासंघातून बाहेर पडल्यास त्यांच्यावर नियंत्रण येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना इंग्लंडमध्ये आणता येईल अशी आशियाई नागरीकांची आशा आहे.इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्यास त्याचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. युरोपियन महासंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जगभरातील शेअरबाजारांवर त्याचा परिणाम होणार असून भारताला अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

महासंघाचे काय

जर इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्या त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. कारण इंग्लंडमधील ब्रे्रक्झीट मागणीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये सुद्धा फ्रेक्झिटच्या मागणीने डोके वर काढले आहे. तसेच आणखी काही देश यातून बाहेर पडण्याच्या किंवा निर्वासिंताना रोखण्याच्या मागणीवर अडले आहे. असे झाले तर हा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या हादरा बसेल. १९३० च्या जागतिक महामंदी सारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.