शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आईचे दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

By admin | Updated: March 18, 2015 23:48 IST

मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून , ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

लंडन : मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून , ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मातेचे दूध पुरेसे मिळणारी मुले मोठी झाल्यानंतर बुद्धीच्या चाचणीत चांगले गुण मिळवू शकतात. ब्राझीलमध्ये या संदर्भात अभ्यास झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे. डॉक्टरांचा असा सल्ला असला तरीही अखेरचा निर्णय मातेचा असतो. मुलाला आपले दूध द्यावे की नाही हा निर्णय माताच घेत असते. नव्या अभ्यासाचे निष्कर्ष द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेवर केवळ आईच्या दुधाचा परिणाम होतो असे नाही, त्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात. आईचे शिक्षण, कुटुंबाचे उत्पन्न, जन्माच्या वेळी मुलाचे वजन हेही घटक मुलाच्या विकासात कारणीभूत असतात. ब्राझीलमधील पेलोटास येथील डॉ. बर्नार्डो लेसा होर्टा यांच्या मते या संशोधनाने आत्मदृष्टी जागृत होते. ज्या मातांचा त्यांनी अभ्यास केला त्यात सर्व स्तरात बाळांना मातेचे दूध देण्याची पद्धत होती. केवळ श्रीमंत व सुशिक्षित महिलाच नव्हे, तर सर्व स्तरातील मुलांना मातेचे दूध दिले जात असे. पण काही मुलांना वर्षभर माता पाजत असत, तर काही मुलांना ते एखादाच महिना मिळत असे. ज्यांना वर्षभर वा त्यापेक्षाही जास्त काळ मातेचे दूध मिळाले, ती मुले अभ्यासात वा बुद्धीच्या चाचण्यात अधिक गुण मिळवतात असे स्पष्ट झाले. त्यांनी शिक्षण चांगले पूर्ण के ले व त्यांचे उत्पन्नही चांगले होते. (वृत्तसंस्था)४डॉ. होर्टा यांच्या मते मातेच्या दुधाचे लाभ मुलाला दीर्घकाळ मिळतात. कारण मातेच्या दुधात एकत्रित तीव्र स्थूल आम्लांची साखळी मुलांना मिळते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ती अत्यंत आवश्यक असते. आईचे दूध आणि मुलाच्या बुद्धीचा संबंध असतो हे सिद्ध करण्यासाठी या मुद्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ४इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य खात्याचे राष्ट्रीय संचालक केविन फेंटन यांच्या मते मातेच्या दुधामुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे स्पष्ट आहे. १२ महिन्यांपेक्षा लहान मुलांना आईचे दूध मिळाले पाहिजे.