शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल

By admin | Updated: August 7, 2016 01:48 IST

पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे तुम्ही ऐकले असेल; परंतु पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे महाभागही

लंडन : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे तुम्ही ऐकले असेल; परंतु पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे महाभागही नित्यनेमाने त्यांचे वाचन करू लागतील. चांगल्या पुस्तकाचे तल्लीनतेने वाचन करण्याने आयुष्य वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. येल विद्यापीठाने हा अभ्यास केला. अभ्यासकांनी ३५०० हून अधिक महिला तसेच पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या सवयींचा सलग १२ वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. चांगली कथा वाचल्याने मेंदू सक्रीय राहून तणावापासूनही मुक्ती मिळते, असे अमेरिकन संशोधकांना आढळून आले आहे. दररोज ३० मिनिटे वाचन करण्याची सवयही उपयुक्त ठरू शकते. दैनिके व नियतकालिकांपेक्षा पुस्तक वाचनाने बुद्धी अधिक सक्रीय रहाते आणि त्यामुळे आयुष्य वाढते, असे या संशोधकांनी सांगितले. अभ्यासाच्या प्रारंभी किमान ५० वर्षे वयाच्या लोकांना तुम्ही पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन करता का, करत असल्यास वाचनाला किती वेळ देता, तुमचे आरोग्य कसे आहे आणि तुम्ही विद्यापीठात शिक्षण घेतले आहे काय, यासारखे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या अभ्यासात वाचन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाचनाची आवड असणारे लोक अधिक काळ जगल्याचे आढळले. या अभ्यासाचे निष्कर्ष सोशल सायन्स अ‍ॅण्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतरांच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी कमी राहिले. वेगवेगळ््या शैलीचे पुस्तक वाचण्याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. यापूर्वीच्या एका संशोधनात पुस्तक स्क्रीनवर वाचण्याऐवजी कागदावर आणि शाहीने लिहीलेला मजकूर वाचणे अधिक फायद्याचे असते, असे आढळले होते. (वृत्तसंस्था)संशोधक बेक्का लेवी यांनी सांगितले की, ६५ वर्षांहून अधिक वयाचे लोक दररोज साडेचार तास टीव्ही पाहतात. हा वेळ पुस्तक वाचनात व्यतित करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते. दैनंदिन सवयींत पुस्तक वाचनाला समावेश करणे फायद्याचे आहे.