शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये बॉम्बस्फोटमालिका, २५ ठार ८० जखमी

By admin | Updated: May 14, 2014 03:16 IST

इराकमधील निवडणुकीनंतर राजधानीला हादरवून सोडणारी पहिली बॉम्बस्फोट मालिका घडवत मंगळवारी दहशतवाद्यांनी २५ नागरिकांचा बळी घेतला.

बगदाद : इराकमधील निवडणुकीनंतर राजधानीला हादरवून सोडणारी पहिली बॉम्बस्फोट मालिका घडवत मंगळवारी दहशतवाद्यांनी २५ नागरिकांचा बळी घेतला. इराकमध्ये गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती. अमेरिकी सैन्यदले मायदेशी परतल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. बगदादमधील शियाबहुल भागांना लक्ष्य बनवून गर्दीच्या वेळी हे स्फोट घडविण्यात आले असून, यात ८० जण जखमी झाले आहेत. इराकमध्ये यंदाच्या हिंसाचारात आतापर्यंत ३ हजार ३०० जणांचा बळी गेला आहे. यावर्षी वाढलेल्या हिंसाचारास सरकारने सिरियात सुरू असलेल्या यादवीसारख्या बाह्य घटकांना जबाबदार ठरवले आहे. मात्र, अल्पसंख्याक सुन्नी समुदायाच्या असंतोषातून हे हल्ले होत असल्याचे राजकीय विश्लेषक व मुत्सद्यांचे म्हणणे आहे. सरकारने या समुदायाला संतुष्ट करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत, असे त्यांना वाटते. बगदाद शहरात सकाळी एकूण नऊ बॉम्बस्फोट झाले. त्यातील दोन पूर्वेकडील बलादियात भागातील वाहतूक पोलीस मुख्यालयाजवळ घडविण्यात आले. याशिवाय. सद्र, उर्र जमिला, मामल आणि कर्राडा हे भागही बॉम्बस्फोटांनी हादरले. अरब जुबौर या सुन्नीबहुल भागातही एक बॉम्बस्फोट झाला. यात तीन जण ठार झाले. याशिवाय पश्चिमेकडे एका पोलीस गस्ती पथकाला लक्ष्य करून रस्त्याच्या कडेला स्फोट घडविण्यात आला. यात एकाचा बळी गेला. राजधानीतील अनेक भागातून धुराचे लोट उठताना दिसत होते. अनेक दुकानांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून, नजीकच्या कार सांगाड्यात रूपांतरित झाल्याची माहिती पत्रकारांनी दिली. कर्राडा शहरातील एका गॅरेजमध्ये स्फोट होऊन तीन जण ठार झाले. एक दहशतवादी ग्राहक बनून गॅरेजमध्ये आला होता. तो कार गॅरेजमध्ये उभी करून निघून गेला. या कारमध्ये स्फोटके होती. त्यांचा नंतर स्फोट झाला, अशी माहिती गॅरेज मालक अबु नुर्री यांनी दिली. स्फोट झाला तेव्हा माझा केवळ एकच कर्मचारी गॅरेजमध्ये होता. तो खाली कोसळला. गॅरेजमध्ये सर्वत्र धुरच धूर झाला होता. अनेक लोक रडत होते, तर इतर बाहेर पळत होते, असेही नुर्री म्हणाले. देशाच्या उत्तर भागात झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये एक तरुण मुलगा मृत्युमुखी पडला. कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.