बगदाद : बगदाद विमानतळाच्या तपासणी केंद्राजवळ रविवारी झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटात ५ जण जखमी झाले. या विमानतळावर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे हे विशेष. विमानात प्रवेश करण्याआधी प्रवाशांची तपासणी होते त्या ठिकाणी हा स्फोट झाला. विमानतळापासून हे तपासणी केंद्र काही किलोमीटरवर आहे. २००३ मध्ये अमेरिकेने इराकमध्ये हस्तक्षेप करून अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना सत्तेवरून खाली खेचले, तेव्हापासून इराक सतत हिंसाचाराला तोंड देत आहे.