लागोस : बोको हराम संघटनेने नायजेरियातील बागा येथे केलेला दहशतवादी हल्ला अत्यंत निर्दयी व भीषण ठरला आहे. या हल्ल्यात बोको हरामने २ हजार नागरिकांची हत्या तर केलीच, पण त्यातही नृशंसतेचा कळस गाठत प्रसूती होणाऱ्या एका महिलेला गोळ्या घालून ठार मारले, तर लहान मुलांना ठार मारून त्यांचे तुकडे तुकडे केले, असा दावा अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्क संघटनेने केला आहे. चाड सरोवराच्या काठावर असणाऱ्या बागा शहरातील हत्याकांड पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने ही माहिती दिली आहे. ही महिला प्रसूत होत असताना, बोको हराम दहशतवाद्यांनी तिला गोळ्या घातल्या व तिला होणाऱ्या बाळाचेही तुकडे तुकडे केले, असे या प्रत्यक्षदर्शीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. बागा येथील या हल्ल्यात हजारो लोक मरण पावले. या आकड्याबद्दल अनिश्चितता आहे. ३ जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. हल्ला होताच आम्ही पळू लागलो.
बोको हरामने गाठला नृशंसतेचा कळस
By admin | Updated: January 16, 2015 07:17 IST