इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपस्थिती ही फार मोठी घटना असून, यातून भारत- अमेरिका मैत्रीचे नवे पर्व सुरू होऊ शकते याची दखल पाक सरकारला घ्यावी लागेल, असा इशारा पाकमधील ‘डेली टाइम्स’ने संपादकीय लेखातून दिला आहे. भारत व पाकिस्तान दोघांशीही मैत्रीचे संबंध ठेवणे हे अमेरिकेचे धोरण आहे. सध्याच्या मंदीच्या काळात अमेरिके च्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ फार महत्त्वाची ठरत आहे. भारतीय बाजारपेठ अमेरिकेसाठी मोठे आकर्षण ठरू शकते. भारताला शस्त्रास्त्रे विकल्यास अमेरिकेची अर्थव्यववस्था सुधारू शकते.
ओबामांची भारतभेट मोठीच घटना
By admin | Updated: January 26, 2015 04:33 IST