शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:00 IST

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला अवघे ४८ तास उरले आहेत. राजधानी वॉशिंग्टनमध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. आमंत्रितांच्या याद्यांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनही आता आकार घेऊ लागले आहे. त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे ज्यो बायडेन यांनी प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर भारतीयांची निवड केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. बायडेन यांनी आपल्या प्रशासनात भारतीयांना महत्त्वाचे स्थान असेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी तब्बल २० जणांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आहे. या २० जणांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे. अमेरिकी प्रशासनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्राबल्य असणे हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. बायडेन यांनी नियुक्त केलेल्या २० जणांपैकी १७ जण व्हाइट हाउस परिसरातील कार्यालयांत कार्यरत असतील. कोणाला कोणते पद -नीरा टांडेन (व्हाइट हाउस व्यवस्थापन व बजेट या विभागाच्या संचालिका), डॉ. विवेक मूर्ती (यूएस सर्जन जनरल), वनिता गुप्ता (न्यायविभागाच्या असोसिएट ॲटर्नी), उझरा झेया (मानवाधिकार आणि नागरी सुरक्षा विभागाच्या उपमंत्री), माला अडिगा (अध्यक्षांच्या पत्नीच्या धोरण संचालिका), गरिमा वर्मा (डिजिटल संचालिका), सबरिना सिंग (माध्यम उपमंत्री), ऐशा शाह (डिजिटल धोरणाच्या पार्टनरशिप मॅनेजर), समीरा फाझिली (राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या सहसंचालिका), भारत राममूर्ती (उपसंचालक), गौतम राघवन (अध्यक्षीय कर्मचारीवृंदाचे उपसंचालक), विनय रेड्डी (अध्यक्षांच्या भाषणांचे संचालक), वेदांत पटेल (अध्यक्षांचे माध्यम सहायकमंत्री), तरुण छाब्रा (तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वरिष्ठ संचालक), सुमोना गुहा (दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालिका), शांती कलाथिल (लोकशाही व मानवाधिकारांच्या समन्वयक), सोनिया अगरवाल (हवामान बदलविषयक धोरणाच्या वरिष्ठ संचालिका), विदुर शर्मा (कोविड रिस्पॉन्स टीमचे धोरण सल्लागार), नेहा गुप्ता (सहयोगी वकील), रिमा शहा (उपसहयोगी वकील).

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUSअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष