बैरुत : इस्लामिक स्टेट अथवा इसिसच्या जिहादींनी सिरियातून अपहरण केलेला अमेरिकन मदत कार्यकर्ता पीटर एडवर्ड कासिग याची हत्या केल्याचा दावा केला असून, हा अमेरिकेला इशारा आहे, असे म्हटले आहे. या संदर्भात इसिसने चित्रफीत प्रसिद्ध केली असून त्यात कासिग याच्यासह आणखी १८ जणांचीही हत्या करतानाचे चित्रण आहे. इसिसचे जिहादी करत असलेल्या निर्घृण हत्याकांडातील ही आणखी एक दुर्घटना आहे. हा पीटर कासिग आहे, तुमच्या देशाचा नागरिक असे एक दहशतवादी म्हणत आहे. याआधी दोन अमेरिकन पत्रकार व दोन ब्रिटिश मदत कार्यकर्ते यांची हत्या करताना इसिस दहशतवाद्यांनी असाच पोशाख केला होता. या माणसाच्या पायाखाली कासिगसारखे दिसणारे एक शिर आहे. सिरियातील नागरी युद्धात जखमी झालेल्या लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी पीटर कासिगने आपले प्राण धोक्यात घातले होते. (वृत्तसंस्था)
आणखी एका अमेरिकन नागरिकाचा शिरच्छेद
By admin | Updated: November 17, 2014 03:13 IST