शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मागच्या पावलाने डिप्रेशन येईल

By admin | Updated: July 18, 2015 03:03 IST

तुमचे मन निराशा, औदासिन्याकडे झुकत असेल, तर तुमचा स्मार्ट फोनचा वापर किती हे एकदा तपासून पाहा. स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर निराशेला व डिप्रेशनला कारणीभूत

वॉशिंग्टन : तुमचे मन निराशा, औदासिन्याकडे झुकत असेल, तर तुमचा स्मार्ट फोनचा वापर किती हे एकदा तपासून पाहा. स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर निराशेला व डिप्रेशनला कारणीभूत ठरतो असा नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. सतत फोनवर वेळ घालवणे आरोग्याला बाधक असून ते तुमच्या डिप्रेशनचे द्योतक ठरू शकते, असे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. ६८ मिनिटे स्मार्ट फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती डिप्रेशनग्रस्त असतात असा निष्कर्ष आहे. १७ मिनिटे स्मार्ट फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती मात्र या मानसिक विकाराला बळी पडत नाहीत. फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, फोनवर जास्त वेळ घालविणारे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्या दिनक्रमात वेळेचे महत्त्व नसते. हे लक्षण डिप्रेशनच्या व्याधीचे आहे. हे लोक वेळेवर आॅफिसला जात नाहीत, वेळेवर काम करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसते. या संशोधनात २८ लोकांच्या फोन व जीपीएस वापराचा अभ्यास करण्यात आला. त्यात २० महिला व ८ पुरुष होते. त्यांच्या फोनला बसविलेला सेन्सर दर पाच मिनिटांनी फोनवरील त्यांचे भौगोलिक स्थान व फोनचा वापर याची माहिती देत असे. या माहितीच्या आधारे संशोधकांनी त्यांच्या डिप्रेशनची पातळी ठरवली. हा निष्कर्ष ८७ टक्के अचूक ठरला. (वृत्तसंस्था)स्मार्ट फोनचा अधिक वापर करणाऱ्या व्यक्ती बोलण्याऐवजी सर्फिंग करतात, तसेच गेम खेळतात. जीवनातील दु:ख, ताणतणाव यांचा सामना त्यांना करता येत नाही, त्यामुळे मोबाईल फोनच्या विश्वात मन रमविले जाते. परिस्थितीचा सामना करता न येणे हाही डिप्रेशनचा एक प्रकार आहे, असे नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातील बिहेवियरल इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजीचे संचालक डेव्हिड मोअर यांनी म्हटले आहे.