शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:45 IST

नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या.

बांगलादेशातील बिघडलेल्या राजकीय वातावरणात हिंदूंना भेदभाव आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, बांगलादेशातहिंदूंना केवळ भेदभावाचाच नाही, तर शारीरिक हिंसाचारापासून ते सामाजिक बहिष्कारापर्यंतच्या धमक्या मिळत आहेत. याच बरोबर त्यांची बदनामी करण्यासाठीही विविध प्रकारच्या मोहिमा चालवल्या जात आहेत.

सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांची ताकद वाढली -गेल्या 5 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या.

जीवे मारण्याची धमकी देऊन घेतले जातायत राजीनामे - माध्यमांतील वृत्तांनुसार, चटगाव विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक रोंटू दास यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. याशिवाय त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. सहाय्यक प्राध्यापक रोंटू दास यांनी आपल्यासोबत झालेल्या भेदभावाचा उल्लेख करत राजीनामा दिला. यानंतर तो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. 

हिंदू पोलिसांनाही केलं बडतर्फ -बांगलादेशात हा भेदभाव शैक्षणिक संस्थांबरोबरच, पोलीस खात्यातील हिंदू हिंदू कॅडेट्ससोबतही दिसून आला आहे. नुकतेच शारदा पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 252 पोलीस उपनिरीक्षकांना अनुशासनहीनता आणि अनियमिततेचा आरोप करत बडतर्फ करण्यात आले आहे. 252 उपनिरीक्षकांपैकी 91 हिंदू कर्मचारी होते. या सर्वांची नियुक्ती माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात झाली होती.

"बांगलादेशात हिंदूंविरोधात शत्रुत्वाचे वातावरण तयार होत आहे" -यातच, बांगलादेशात हिंदूंविरोधात शत्रुत्वाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे हिंदूंना त्यांच्या नोकऱ्या आणि इतर संधी गमवाव्या लागत आहेत, असा दावा हिंदू समुदायाकडून करण्यात येत आहे.  यावर, कट्टरतावादी गटांनी विरोध करत, शेख हसीना यांच्या गत सरकारने त्यांच्या पक्षाच्या जवळच्या लोकांना नियुक्त केले होते, असा आरोप केला आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमjobनोकरी