शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:56 IST

बांगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला आहे.

बांगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला आहे. त्याऐवजी, बौद्ध, हिंदू मंदिरं, ऐतिहासिक स्मारकं आणि कलाकृती यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत.

बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी 'एएएफपी' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “नवीन नोटा देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील. यामध्ये मानवी प्रतिमांऐवजी वास्तुशिल्प, निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्मृतीस्थळे अधिक ठळक असतील.”

या नोटांमध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांची चित्रं, प्रसिद्ध चित्रकार जैनुल आबेदीन यांची कलाकृती, तसेच राष्ट्रीय शहीद स्मारकाचा समावेश करण्यात आला आहे. या डिझाईनचा उद्देश १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे हा आहे. नवीन चलन बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर वितरित करण्यात येणार आहे.

राजकीय पार्श्वभूमीमुळे बदल?या चलन बदलाला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहेत. जानेवारी २०२५मध्ये बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर शेख हसीनांना देश सोडावा लागला आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर, देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले असून नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.

चलनबदलाचा इतिहास बांगलादेशने राजकीय बदलांनंतर चलनात मोठा बदल करण्याची ही पहिली वेळ नाही. १९७२ मध्ये देशाने स्वतंत्रता प्राप्त केल्यानंतर प्रथम आपल्या नोटांवर नकाशा छापला होता. नंतरच्या काळात शेख मुजीब यांचे फोटो जवळपास सर्वच नोटांवर दिसू लागले. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांचा फोटो चलनावर कायम होता.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश