शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम

By admin | Updated: May 6, 2016 01:56 IST

१९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती

ढाका : १९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती-उर-रहमान निजामी याचे अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावले. त्यामुळे या नेत्याला धक्का बसला आहे. निजामीने अंतिम अपीलद्वारे या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय अपीलीय खंडपीठाने एकाच वाक्यात निर्णय सुनावला. ७२ वर्षांच्या निजामी यांच्या अंतिम अपीलवर निर्णय देताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘अपील फेटाळण्यात येत आहे.’ मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या या देशात सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचलेले सिन्हा हे पहिले हिंदू आहेत. हत्या, बलात्कार व कट रचून बुद्धिवाद्यांच्या हत्या केल्या प्रकरणी निजामीला दोषी ठरविण्यात आले असून, त्याची आतापर्यंतची सर्व अपीले फेटाळण्यात आली आहेत. गुरुवारी त्याचे अखेरचे अपीलही फेटाळले गेले. निकालाचे लिखित स्वरूपातील विवरण नंतर जारी केले जाईल, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीदरम्यान निजामीची उपस्थिती आवश्यक नव्हती. जमातच्या प्रमुखास काशीपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्युदंड झालेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बराकीत ठेवण्यात आले आहे.