शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियातील मलेशियनना देश सोडण्यास बंदी

By admin | Updated: March 8, 2017 01:45 IST

मलेशियाच्या नागरिकांना उत्तर कोरियाने मंगळवारी देश सोडून जाण्यास बंदी घातली. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांच्या

कुआला लुम्पूर : मलेशियाच्या नागरिकांना उत्तर कोरियाने मंगळवारी देश सोडून जाण्यास बंदी घातली. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांच्या येथील विमानतळावर झालेल्या हत्येनंतर आमच्या नागरिकांना मलेशियाने ओलीस ठेवल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला असून त्या कृतीला जशासतसे उत्तर आता त्याने दिले आहे. अण्वस्त्रांचा कार्यक्रम उत्तर कोरियाने थांबवावा यासाठी त्या देशावर कठोर निर्बंध असूनही जपानच्या समुद्रात त्याने क्षेपणास्त्रे डागल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर मोठी टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने मलेशियन नागरिकांना देशाबाहेर जाण्यास अडवले. या निर्णयामुळे उभय देशांतील तणाव आणखी वाढला आहे. मलेशियाच्या नागरिकांवर देश सोडून जाण्याची बंदी ही तात्पुरती आहे, असे उत्तर कोरियाची वृत्तसंस्था ‘डीपीआरके’ने म्हटले. मलेशियन नागरिकांवरील बंदी ही किम जोंग-नाम यांच्या मृत्युची पारदर्शकपणे सोडवणूक करून मलेशियातील उत्तर कोरियाचे अधिकारी, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईपर्यंत राहील, असे उत्तर कोरियाने म्हटले. (वृत्तसंस्था)