शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममध्ये शेजारी विवस्त्र अनोळखी व्यक्ती झोपल्याने भंबेरी

By admin | Updated: August 18, 2015 22:30 IST

चोरून घरात शिरलेला एक पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम बेडरूममध्ये येऊन गुपचूप आपल्या शेजारी झोपल्याचे समजले तेव्हा एका आॅस्ट्रेलियन जोडप्याची

मेलबर्न : चोरून घरात शिरलेला एक पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम बेडरूममध्ये येऊन गुपचूप आपल्या शेजारी झोपल्याचे समजले तेव्हा एका आॅस्ट्रेलियन जोडप्याची चांगलीच भंबेरी उडाली!‘डेली टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार न्यू साऊथ वेल्स राज्यातील मरोब्रा शहरात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही अनोखी घटना घडली. घरात येऊन झोपलेला २५ वर्षांचा विवस्त्र इसम आयरिश असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या इसमावर घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून अमली पदार्थांच्या सेवनाने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे की कसे याची तपासणी करण्यासाठी त्याला लगेच नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. या वृत्तानुसार केटी आणि क्रिस हे दाम्पत्य त्यांच्या घरात झोपलेले होते. रात्री दोन वाजता केटीला जाग आली तेव्हा तिला आपल्या एका बाजूला आपला पती व दुसऱ्या बाजूला पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम शांतपणे झोपला असल्याचे दिसले. केटीने क्रिसला जागे केले व भयभीत अवस्थेत तो अनोळखी इसम त्याला दाखविला. क्रिसने हटकल्यावर त्या आगंतुकाने जागे होऊन डोक्याशी काढून ठेवलेले आपले कपडे उचलले व तो सरळ घराबाहेर जायला निघाला. हातात घेतलेले कपडे न घालताच त्या इसमाने तशाच अवस्थेत किचनच्या खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. ते न जमल्याने तो घरातच इकडे-तिकडे फिरत राहिला. अखेर पोलीस आले व त्याला पकडून घेऊन गेले. या दाम्पत्याने एक मांजर पाळलेले आहे. त्याला घरात येता यावे यासाठी त्यांनी किचनची खिडकी रात्री उघडी ठेवली होेती. त्यातूनच हा अनोळखी इसम घरात शिरला असावा, असा या दाम्पत्याचा कयास आहे. पण कपडे असूनही तो विवस्त्र अवस्थेत का होता व घरात शिरल्यावर तो बेडवर येऊन गुपचूप का झोपला हे कोडे मात्र लगेच सुटले नाही! (वृत्तसंस्था)