शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हवाई हल्ल्यात इसिसचा म्होरक्या अल बगदादी ठार ?

By admin | Updated: June 14, 2016 13:33 IST

ओसामा बिन लादेननंतर क्रूर दहशतवादी म्हणून ओळख निर्माण करणारा इसिसचा प्रमुख म्होरक्या अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

रक्का, दि. १४ - ओसामा बिन लादेननंतर क्रूर दहशतवादी म्हणून ओळख निर्माण करणारा इसिसचा प्रमुख म्होरक्या अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सिरीयामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.  उत्तर सिरीयामध्ये इसिसचा बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये जोरदार हवाई हल्ला झाला. 
 
त्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.  अमेरिका किंवा अन्य कुठल्याही देशाने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. इराण आणि तुर्कीश वर्तमानपत्र येनिस सफाकने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. इसिसचा खलिफा बगदादी रविवारी झालेल्या हल्ल्यात ठार झाला असे अल अमाक्यू वृत्तसंस्थेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 
 
रमजानच्या पाचव्या दिवशी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
मोसूलपासून ६५ कि.मी. अंतरावर हल्ल्यामध्ये बगदादी जखमी झाल्याचे वृत्त 'अल सुमारीया' या इराकी टीव्ही वाहिनीने दिले आहे. डोक्यावर अडीचकोटी डॉलरचे इनाम असलेला बगदादी मागच्या सहा महिन्यांपासून ठिकाणे बदलत असून तो मोसूलला आल्याचे वृत्त सीएनएन या अमेरिकन वाहिनीने संरक्षण अधिका-यांच्या हवाल्याने दिले होते.