शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 10, 2016 06:45 IST

बगदाद शहर दोन आत्मघाती बॉम्बस्फोटानं पुन्हा एकदा हादरलं आहे.

ऑनलाइन लोकमतइराक, दि. 10 - बगदाद शहर दोन आत्मघाती बॉम्बस्फोटानं पुन्हा एकदा हादरलं आहे. बगदादजवळच असलेल्या नखील या मॉलजवळ दोन कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात  28हून अधिक लोक जखमी आहेत.

पहिला बॉम्बस्फोट कार पार्किंग केलेल्या परिसरात झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट हा नखील मॉलजवळील स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीतून आलेल्या आत्मघाती हल्लेखोरानं घडवून आणला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी मध्य बगदादमधल्या पॅलेस्टाइन रस्त्यावर हा मॉल सुरू करण्यात आला आहे. ईद अल-अधा जवळ आल्यानं वीकेंडच्या दिवशीही हा मॉल सुरू ठेवण्यात आला होता. या मॉलला अनेक मजले असून, प्रत्येक मजल्या दुकानं आहेत. या मॉलमध्ये शहरातला प्रसिद्ध सिनेमागृहही आहे, अशी माहिती इंटिरियर मंत्रालयानं दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस)नं स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यातच बगदादमधल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात 300 जण ठार झाले होते.