शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्कांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे

लंडन : नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे. मोदी सत्तेत आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्याचा दावा अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने केला आहे. जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, संघटनेने सरकारच्या विकासकामांबद्दल गौरवोद्गारही काढले आहेत.भूमी अधिग्रहणावरून संसदेत आणि बाहेर सरकारला विरोधाचा सामना करावा लागला असताना यावर अ‍ॅमनेस्टीनेही ताशेरे ओढले आहेत. या अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे, अशा परखड शब्दांत अ‍ॅमनेस्टीने आपले मत मांडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झटत असलेल्या अ‍ॅमनेस्टीच्या २०१५ च्या वार्षिक अहवालामुळे मोदी सरकारची जागतिक नाचक्की झाली आहे. अ‍ॅमनेस्टीच्या ताज्या अहवालात मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित हिंसाचार, जातीय दंगली आणि कॉर्पोरेटशी संबंधित योजनांबाबत सल्लामसलत करण्यात सरकारला अपयश आल्याचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. सरकारी अधिकारी नागरिकांचे खासगीपण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे सातत्याने उल्लंघन करत असल्याच्या मुद्याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. जातीय हिंसाचाराचा हवाला देत अहवालात म्हटले की, ‘निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भडकलेल्या जातीय हिंसाचाराने हिंदू व मुस्लिम समुदायात तणाव वाढला. यासाठी राजकीय नेते जबाबदार आहेत व काही प्रकरणात प्रक्षोभक भाषणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.’ अहवालात डिसेंबरमध्ये हिंदू संघटनांवर अनेक मुस्लिम व ख्रिश्चन यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा आरोप झाल्याचेही म्हटले आहे. (वृत्तसंस्था)