शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

IQ टेस्टमध्ये दहा वर्षाच्या मुलानं आइनस्टाइन आणि हॉकिंगला टाकले मागे

By admin | Updated: August 10, 2016 20:56 IST

भारतीय वंशाच्या लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या 10 वर्षांच्या ध्रुव तलाटी या मुलानं IQ टेस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे 162 गुण मिळवले

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 10 - भारतीय वंशाच्या लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या 10 वर्षांच्या ध्रुव तलाटी या मुलानं IQ टेस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे 162 गुण मिळवले आहेत. त्याच्या देदीप्यमान यशामुळे जगभरात त्याचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. जगातील सर्वात मोठी आणि जुनी IQ टेस्ट सोसायटीनं घेतलेल्या मेन्सा कॅटल थर्ड बी टेस्टमध्ये ध्रुवनं हे गुण प्राप्त केले आहेत. या IQ टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ध्रुवनं बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे सोडलं आहे. IQ टेस्टमध्ये 162 गुण मिळवल्यानं ध्रुव ता-यासारख्या जगभरात चमकला आहे. ध्रुवला जगभरातला सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती म्हणून किताब बहाल करण्यात आला आहे.

लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या ध्रुव तलाटीनं मेन्सा इंटेलिजन्स टेस्टसंबंधित कॅटल थर्ड बी पेपर गेल्या महिन्यातल्या जुलैमध्ये दिला होता. त्याच परीक्षेत ध्रुवनं प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाइन आणि हॉकिंग यांच्याहून 2 गुण जास्त मिळवले आहेत. या अलौकिक यशामुळे 10 वर्षांच्या ध्रुवला काही मोजक्या बुद्धिमान लोकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

ध्रुव लंडनमधल्या बार्किंगसाइडच्या फुलवूड या प्राथमिक शाळेत अभ्यासाचे धडे गिरवतो आहे. IQ टेस्टमध्ये ध्रुवला 150 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तर त्यानं अचूक दिली आहेत. याआधी याच टेस्टमध्ये आइनस्टाइन आणि हॉकिंगनं 160 गुण मिळवले होते. मात्र ध्रुवनं कमी वयात 162 गुण मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.