शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

गोठविलेल्या गर्भाशयातून बाळाचा जन्म

By admin | Updated: June 10, 2015 23:56 IST

वयाच्या १३ व्या वर्षी गर्भाशयाच्या गोठविलेल्या उतीच्या साहाय्याने आता २८ वर्षांची असलेली माता मुलाला जन्म देत असून जगात अशी प्रसूती प्रथमच होत आहे

ब्रुसेल्स : वयाच्या १३ व्या वर्षी गर्भाशयाच्या गोठविलेल्या उतीच्या साहाय्याने आता २८ वर्षांची असलेली माता मुलाला जन्म देत असून जगात अशी प्रसूती प्रथमच होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही क्रांती मानली जात असून जर्नल ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या शस्त्रक्रियेने तरुण वयात कर्करोग झालेल्या व त्यानंतर घेण्यात येणाऱ्या केमोथेरपीमुळे गर्भाशयाचे नुकसान झालेल्या महिलांना नवा आशेचा किरण दाखवला आहे. ब्रुसेल्स येथील इरास्मूस रुग्णालयातील गायनाकॉलॉजिस्ट डॉ. इसाबेल देमीस्तरे यांनी १५ वर्षांपूर्वी गोठविलेले अंडाशय महिलेत प्रत्यारोपित केले. ही मुलगी १३ वर्षाची असताना अंडाशय गोठविण्यात आले होते. त्यावेळी ती वयात आलेली होती की नव्हती ही बाब येथे स्पष्ट करण्यात आलेली नाही. रुग्ण महिला रिपब्लिक आॅफ कांगोमध्ये जन्मली असून, ११ वर्षांची असताना ती बेल्जियममध्ये गेली. तिला सिकल सेल अ‍ॅनिमिया झाल्यानंतर भावाच्या बोनमॅरोने जीवदान दिले आहे. या प्रक्रियेत केमोथेरपीचे उपचार द्यावे लागतात. केमोथेरपीमुळे शरीर बोनमॅरो नाकारत नाही. ती १४ वर्षांची होण्याआधी डॉक्टरांनी तिच्या अंडाशयाची उजवी बाजू काढली व ती गोठविण्यात आली. यानंतर तिला मासिक पाळी आली नाही. पण तारुण्याची इतर लक्षणे जाणवू लागली. ती १५ वर्षाची झाल्यानंतर डॉक्टरांनी हार्मोन उपचार चालू केले. १० वर्षांनंतर तिने स्वत:चे कुटुंब सुरू करण्याचा विचार केला. त्यानंतर डॉ. इसाबेल देमीस्तरे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले व तिच्यावर गोठविलेल्या अंडाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली व दोन वर्षांनंतर ती गर्भवती राहिली. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तिने निरोगी बाळाला जन्म दिला आहे. तिचे अंडाशय पुन्हा काम करेनासे झाले तर तिच्यावर पुन्हा एकदा अंडाशयाच्या तुकड्याचे प्रत्यारोपण केले जाईल व तिला आणखीही मुले होऊ शकतील.