शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

ऑस्ट्रेलियामध्ये १० हजार उंट मारणार; ९० हजार वन्यप्राणी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 06:30 IST

ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांना लागलेल्या भीषण वणव्यामध्ये ५० कोटींहून अधिक वन्यप्राणी मरण पावल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे;

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांना लागलेल्या भीषण वणव्यामध्ये ५० कोटींहून अधिक वन्यप्राणी मरण पावल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे; पण त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण आॅस्ट्रेलियातील १० हजार उंटांना गोळ्या घालून ठार मारण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. उंटांना ठार मारण्याची मोहीम पाच दिवस राबविण्यात येणार आहे.वणव्यात अडकलेल्या, होरपळलेल्या, गुदमरलेल्या आणि जखमी झालेल्या वन्यप्राणी व पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथील स्थानिक नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. स्टीव्ह आयर्विन व त्यांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत ९० हजार प्राणी व पक्षी यांचे जीव वाचविले आहेत. त्यामुळे त्यांचे जगभरात कौतुक होत असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ न आॅस्ट्रेलियातील इतर लोकही प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत; पण याच काळात दक्षिण आॅस्ट्रेलियातील १० हजार उंटांची हत्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सरकारच्या या मोहिमेवर जगभरातील प्राणीप्रेमींनी टीका केली आहे. उंटांच्या हत्येसाठी हेलिकॉप्टर रवाना केले असल्याचे वृत्तआहे. ऑस्ट्रेलियातील काही भागांत सध्या दुष्काळ असून, पाण्याचेही प्रचंड दुर्भिक्ष आहे. अशा वेळी उंट फार पाणी पितात आणि लोकांना त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते, हे कारण पुढे करून उंटांच्या हत्येची मोहीम हाती घेण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. जंगलांमध्ये पाण्याचे साठेच शिल्लक नसल्याने नागरी वस्त्यांत येऊ न उंट पाणी संपवत आहेत, अशी दक्षिण आॅस्ट्रेलियातील स्थानिकांची तक्रार आहे. या तक्रारींची दखल घेत उंटांना गोळ्या घालून ठार मारण्याच्या सूचना सरकारच्या संबंधित विभागो व्यावसायिक शूटर्सना दिल्या आहेत. हेलिकॉप्टरमधून उंटांना गोळ्या घालण्यात येणार आहेत. एकीकडे वणव्यामुळे वन्यप्राणी व पक्षी नामशेष होत आहेत, तर दुसरीकडे उंटांना मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांनी आॅस्ट्रेलियावर दबाव आणून ही मोहीम थांबवायला भाग पाडावे, अशी मागणी विविध देशांतील प्राणीप्रेमींनी सुरू केली आहे.>आगीचे लोण अर्जेंटिना, चिलीपर्यंतसध्या आॅस्ट्रेलियातील काही भागांत प्रचंड उन्हाळा असून, तापमान ५0 अंश सेल्शियसच्या घरात गेले आहे. त्यातच खुरटी जंगलांना लागलेल्या आगीमुळे ते वाढले आहे. पर्यावरणासाठी प्रयत्न करण्याच्या मोहिमेची पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी खिल्ली उडवली होती.आताच्या जंगलांना ज्या भयावह आगी लागत आहेत, त्याला वातावरणातील बदल अजिबात कारणीभूत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे; पण आॅस्ट्रेलियातील आग आता अर्जेंटिना व चिली या देशांतील जंगलांत पोहोचली आहे.