शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

आॅस्ट्रेलियात वणवा; शंभरावर घरे खाक

By admin | Updated: December 27, 2015 00:18 IST

आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ऐन नाताळच्या दिवशी वणवा (जंगलातील आग) भडकून १०० घरे खाक झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याई रिव्हर भागात

सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ऐन नाताळच्या दिवशी वणवा (जंगलातील आग) भडकून १०० घरे खाक झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याई रिव्हर भागात ९८, तर सेपरेशन क्रीकमध्ये १८ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. व्हिक्टोरियाच्या नैऋत्येकडील ग्रेट ओशन रोडलगत हा वणवा भडकला असून, तो काबूत आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. पावसाच्या सरी कोसळून वातावरण थंड झाल्यामुळे वणव्याची धोकादायकता मोठ्या प्रमाणात घटली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सतर्कतेची पातळी कायम ठेवण्यात आली आहे. वाऱ्याची दिशा बदलून आग शहराच्या दिशेने सरकेल, अशी भीती निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी लोकप्रिय पर्यटनस्थळ लोर्ने येथील १,६०० पर्यटक आणि रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तथापि, धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना शनिवारी परतण्याची मुभा देण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५०० अग्निशमन कर्मचारी, ६० बंब आणि १८ विमाने तैनात करण्यात आली आहेत. हा फौजफाटा अहोरात्र काम करीत आहे, असे व्हिक्टोरिया आपत्कालीन व्यवस्थापन आयुक्त क्रेग लॅपस्ले यांनी सांगितले. वणव्याचा तात्काळ धोका दूर झाला असला तरी या आगीत अनेक आठवडे धगधगण्याची क्षमता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.