शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला

By admin | Updated: August 27, 2016 04:27 IST

जर्मन चॅन्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा कथित प्रयत्न झेक पोलिसांनी एका शस्त्रधारी व्यक्तीला अटक करून उधळून लावला.

प्राग : जर्मन चॅन्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा कथित प्रयत्न झेक पोलिसांनी एका शस्त्रधारी व्यक्तीला अटक करून उधळून लावला. मर्केल यांच्या येथील दौऱ्यात संशयिताने त्यांच्या वाहनताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस प्रवक्ते जोसेफ बोकन यांनी गुरुवारी येथे सांगितले. प्रागचे गुप्तचर या घटनेची चौकशी करीत आहेत. झेक रिपब्लिकचे पंतप्रधान बोहुस्लॉव सोबोत्का यांची भेट घेण्यासाठी मर्केल प्रागच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मर्केल विमानतळावरून शहराकडे येत असताना एक संशयित काळी मर्सिडीज कार त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात शिरली. पोलिसांनी या कारला बाजूला होण्याच्या सूचना केल्या; मात्र चालकाने ऐकले नाही. पोलिसांनी गोळी मारण्याचा इशारा दिल्यानंतरच तो थांबला आणि कारमधून बाहेर आला. गेल्या १२ महिन्यांपासून हल्ल्यांचे सत्र असल्याने युरोपमध्ये सतर्कता बाळगण्यात येत असताना ही घटना घडली. इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेने फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम येथे हल्ले करून शेकडो लोकांचे प्राण घेतले आहेत. (वृत्तसंस्था)