शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

"बांगलादेशच्या हिंदूंवरील हल्ल्यांना खूप वाढवून सांगितलं जातंय, घडतंय ते चूक आहे, पण.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:15 IST

Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केला मोठा दावा

Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातीलहिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना मोठा दावा केला. या गोष्टींना मुद्दामून वाढीव पद्धतीने दाखवले जात आहे असा दावा त्यांनी केला. यासोबतच भारतात या घटना कशाप्रकारे दाखवल्या जात आहेत, त्या माध्यमांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केले. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हा जातीय मुद्दा नाही, याला राजकीय वळण दिल जात आहे. मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले आहे की हा मुद्दा मूळ प्रमाणापेक्षा अतिशयोक्तीने वाढवला जात आहे. या घटनांना विविध मुद्द्यांच्या छटा आहेत.

"जेव्हा शेख हसीना आणि अवामी लीग यांच्या अत्याचारानंतर देश अशांत होता, तेव्हा जे लोक त्यांच्यासोबत होते त्यांनाही हल्ल्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर काहींनी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना हिंदूंना मारहाण केली, कारण बांगलादेशातील हिंदू म्हणजे अवामी लीग समर्थक असा समज आहे. जे घडले ते योग्य आहे असे मी अजिबात म्हणत नाही, पण काही लोक या गोष्टींचा गैरवापर करत आहेत."

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार झाल्यानंतर लगेच युनूस यांनी गेल्या महिन्यात नवी दिल्लीशी संपर्क साधला होता. त्यांच्या पहिल्या थेट संपर्कात युनूस यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की ढाकामधील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक गटांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाची पुष्टी केली आणि हिंसाचारग्रस्त देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर दिला.

मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, बांगलादेश हा इतर देशांप्रमाणेच दुसरा शेजारी आहे. मी हिंदू समुदायाच्या सदस्यांना भेटलो तेव्हाही त्यांना हिंदू म्हणून ओळख देऊ नये अशी विनंती केली होती. त्यापेक्षा तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला समान अधिकार आहेत असे म्हणायला सांगितले होते. नागरिक म्हणून तुमचे कायदेशीर अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी